केआयटीमध्ये ‘टेक फ्युजन’ उत्साहात; शिवाजी विद्यापीठाच्या लिड कॉलेज अंतर्गत प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन
schedule01 Apr 24 person by visibility 384 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या लीड कॉलेज योजनेच्या अंतर्गत ‘टेक फ्युजन’ या प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयांमध्ये करण्यात आले. शनिवार ,२३ मार्च २०२४ रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये ७ महाविद्यालयातील ५० प्रोजेक्ट व दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये प्रश्नांची उकल काढण्याचे कौशल्य विकसित करणे,तांत्रिक कौशल्य वाढवणे, आंतर विभागीय विद्यार्थ्यांमध्ये समन्वय तसेच सहकार्याची भावना वाढवणे, विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्राशी जोडून तेथील अनुभव त्यांना देणे हा मुख्यत्वे हेतू या स्पर्धेमागील होता. आपल्या अवतीभवती असलेल्या काही तांत्रिक प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टच्या माध्यमातून केलेला होता.
या स्पर्धेच्या परीक्षणासाठी परीक्षक म्हणून व्यावसायिक क्षेत्रातून तंत्रज्ञ सर्जेराव आरगे, अन्य प्राध्यापक यांना निमंत्रित करण्यात आलेले होते.
या स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ.अमित सरकार व सह समन्वयक म्हणून डॉ.मनोज यादव यांनी काम पाहिले. प्रा.निखील सौन्दत्तीकर याचे मोलाचे योगदान या स्पर्धेच्या नियोजनात मिळाले. प्रा. वैष्णवी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी , रजिस्ट्रार डॉ. मनोज मुजुमदार यांचे बहुमोल मार्गदर्शन व संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले यांचे या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रोत्साहन लाभले.
स्पर्धेचा निकाल
• प्रथम क्रमांक:-
🔸️ कृतिका गोडबोले व अन्य (केआयटी)
• द्वितीय क्रमांक:- (विभागून)
🔸️ धनंजय पवार व अन्य (भारती विद्यापीठ)
🔸️ विवेक मंगसुळे व अन्य (डी. के. टी.ई.)
• तृतीय क्रमांक (विभागून)
🔸️ पारशती भागवत व अन्य (डी. के. टी.ई.)
🔸️ प्रणव सातपुते व अन्य (डी. के. टी.ई.)
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक रु.१०,०००/- द्वितीय पारितोषिक रु.७५००/- तृतीय पारितोषिक रु. ५०००/- स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.