कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील पॅचवर्कची व सिलकोटची कामे सुरु
schedule14 Oct 25 person by visibility 80 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पॅचवर्कची व कार्पेट सिल्ककोटची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार सदरची कामे चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत करण्यात येत आहेत.
यामध्ये विभागीय कार्यालय क्र.१ अंतर्गत आयटीआय ते तपोवन ते कळंबा जेल, आयटीआय ते नाळे कॉलनीकडे जाणारा मेनरोडवर डांबरी पॅचवर्क करण्यात आले. विभागीय कार्यालय क्र.२ अंतर्गत नगरोत्थान योजनेअंतर्गत 100 कोटी मधून दसरा चौक ते मिरजकर तिकटी या मुख्य रस्त्याचे पुर्नरपुष्टीकरण करण्याचे काम सुरु आहे. विभागीय कार्यालय क्र.३ अंतर्गत राजारामपूरी बस रुट, टेंबलाई चौक ते टाकाळा चौक, पी.एन.पाटील बंगला या मेनरोडवर डांबरी पॅचवर्क पूर्ण करण्यात आले. विभागीय कार्यालय क्र.४ अंतर्गत बापट कॅम्प येथे ठेकेदारामार्फत सेकंड लेयर कार्पेट सिल्ककोटचे काम सुरू करण्यात आली आहेत. तसेच ट्रेड सेंटर समोरील रस्ता डिपार्टमेंटली डांबरी पॅचवर्क पुर्ण करण्यात आले आहे.
ही कामे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नियंत्रणात पार पडली. सदरची कामे उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर व निवास पोवार यांनी करुन घेतली.