SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नागदेववाडी येथील केंद्रीय शाळेत आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादचोरीच्या 15 मोटर सायकलींसह एकूण 10,25,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; सराईत मोटर सायकल चोरटयास अटक...श्रुती कुलकर्णी यांचे निधनपालकांनी मुलांना समजून घेतले तरच ताण- तणाव कमी होतील कोल्हापुरात बाजारात वडाप घुसल्याने भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, दोन महिला जखमीसैनिक कल्याण कार्यालयात 72 लिपिक टंकलेखक पदांची भरतीकोरे डिप्लोमा मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आरटीओ कॅम्पचे आयोजन...तालुका लोकशाही दिनाचे 24 ऑक्टोबर रोजी आयोजनपदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्यएसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जाहिरात

 

पालकांनी मुलांना समजून घेतले तरच ताण- तणाव कमी होतील

schedule14 Oct 25 person by visibility 140 categoryशैक्षणिक

हल्ली अगदी लहान वयातील मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण कोणत्या ना कोणत्या तरी दडपणाखाली जगत असतात. ताणतणाव ही रोजच्या जीवनातील अगदी सामान्य बाब झालेली आहे. शालेय जीवनात हे ताणतणावाचे क्षण येत असतात. परीक्षा आली, अभ्यास करायचाय, स्पर्धा आहेत, वर्गात वैयक्तिक स्वरूपात विचारली जाणारी प्रश्नोत्तरे, शिक्षक किंवा आई वडील रागावून ओरडले तर आला ताण. शालेय जीवनात तर ताणतणाव हे नित्याचेच झाले आहेत. या ताणाचा परिणाम मुलांच्या वर्तणुकीवर होत असतो त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्यास सुरुवात होते. अपयश, अभ्यासात रस न वाटणे, कंटाळवाणेपणा अशा नकारात्मक भावना सुरू होतात आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर कायमचा परिणाम होतो. मुलांच्या मानसिकतेवर जास्त प्रमाणात परिणाम होऊन त्यांना नैराश्य येऊ लागते. कलह, वाद सुरू होतात. यातून आयुष्याबद्दल वाईट किंवा अंतिम टोकाचा निर्णय घेण्याचे विचार वाढत जातात. या सर्व गोष्टींचा विचार करता मुलांमधील ताण, निराशा हे कमी करण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे.

▪️ताणाचे दोन प्रकार आहेत
सकारात्मक ताण जो घेतल्याशिवाय कोणतीही कृती करताना नकारात्मक ताण आपले मन काही करण्याचा विचारच करीत नाही. ताणाचे समायोजन जेवढे पटकन होईल, तेवढा प्रगतीचा वेग जास्त तसेच समाधानाची, आनंदाची शक्यता जास्त. यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते.
मानसिक ताण किंवा तणावग्रस्त विद्यार्थी कसा ओळखाल?
ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला घडवायचे आहे, त्यांना नीट ओळखायला शिका, त्यांच्या हालचाली निरखा, त्यांचे निरीक्षण करा, त्यांच्या मनात डोकावा, ते ताणतणावाखाली येण्याचे. कारण शोधा. शिक्षकांनी हे केल्यास विद्यार्थ्यांचे चांगले सहकार्य
मिळून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ते गुणात्मक भर घालू शकतील. विद्यार्थ्यांची बलस्थाने, त्रुटी, कमतरता, त्यांची आवड, क्षमता, कौशल्य यांची सर्व माहिती, शिक्षक मिळवू शकले तर त्यांना चांगले शिक्षण देता येईल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविण्यास शिक्षकांना मदत होईल.

१) सातत्याने चिंता वाटणे : विद्यार्थ्यांकडून सतत नकारात्मक
बोलणे होत असते तसेच परिस्थितीपासून पळून जाण्याची विधाने ते करीत असतात. विद्यार्थी असे करू लागले की, ओळखायचे ते कोणता तरी ताण घेते आहेत.

२) चिडचिडी वृत्ती : वस्तू फेकून देणे, एखाद्याचा राग राग करणे, वस्तू फाडणे, तोडणे अशा कृती विदयार्थ्यांकडून घडू लागल्या की समजावे ताण आहे.

३) एकाग्रता कमी होणे: विद्यार्थी सतत वेगवेगळ्या गोष्टी करतात. एकच काम जास्त वेळ न करणे, एका जागेवरून सतत उठणे यांसारख्या कृतींतून त्यांच्यावर असलेला ताणतणाव ओळखता येतो.

४) सततचा थकवा : सतत अभ्यास केला किंवा कोणतीही काम करत राहिल्यास थोडे काही काम केल्यावर लगेचच थकवा
येतो. आपल्या शरीरातील ऊर्जा कमी होऊन अचानकपणे कमी बोलणे, एखाद्या कामात, खेळात कमी सहभाग घेणे, कोणत्याही कामाची आवड नसणे किंवा ते करण्याचा कंटाळा करणे इ. मुळे विद्यार्थी तणावामध्ये आहेत असे समजते.

५) अचानक होणारे बदल विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या  सवयीं मध्ये थोडेफार बदल जाणवतात.

६) छंद : अचानकपणे बदल होणे. उदा. कमी बोलणे, शांत राहणे, खेळण्यात रस नसणे, आवडीच्या कामात लक्ष नसणे इ.
६ ) परिस्थिती व वातावरण विदधार्थ्यांवर परिस्थितीचा तसेच
त्या त्या वातावरणाचा कळत नकळत परिणाम होत असतो. मानसिक ताणतणाव वाढण्यास, निराश होण्यास शारीरिक, मानसिक, बौद्धिक घटक जसे कारणीभूत असतात तसेच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि कौटुंबिक घटकही कारणीभूत ठरतात. या सर्वांतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
शिक्षकांची भूमिका
निराशा, ताणतणाव, आत्महत्या इ. गोष्टींपासून मुक्ती मिळण्यासाठी शिक्षकांनी पुढीलप्रमाणे उपाय केले पाहिजेत.

१ ) योगा आणि व्यायाम दैनंदिन जीवनामध्ये दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यासाठी व कामातील उत्साह वाढविण्यासाठी
रोजच्या शारीरिक हालचालींना प्राधान्य द्यावे. तंदुरुस्ती, जोम, उत्साह, ताकद यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यासाठी योगा आणि व्यायामाला दैनिक वेळापत्रकात स्थान द्यावे. तुकाराम महाराज म्हणले आहेत लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे.
२) चिंतन आणि मनन परिपाठातून ध्यान व प्राणायाम हे दररोज घेणे आवश्यक आहे.
३) अभिव्यक्ती कौशल्य मन मोकळे करू यासारख्या उपक्रमातून त्यांचे विचार ऐकून घेणे, त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी व्यासपीठ (मंच) उपलब्ध करून दिले पाहिजे.
४) छंद जोपासणे : रोजच्या कामांना चालना देणे, त्यांच्या छंदांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी वेळोवेळी प्रदर्शन किंवा व्याख्याने आयोजित करणे.
५) मनोरंजक खेळ : अभ्यासाच्या सततच्या तणावामुळे खेळासारखे महत्त्वाचे टॉनिक आपण विसरतो. भरपूर मैदानी खेळ खेळणारे विद्यार्थी अभ्यासात प्रगती करतात असा अनुभव आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारते, त्यांची निर्णयक्षमता, एकाग्रता, निरीक्षणशक्ती व आत्मविश्वास वाढतो. मनाला व मेंदूला आराम मिळतो, शरीरातील रक्ताभिसरण वाढायला मदत होते, ताजेतवाने वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांत ताणतणावाशी मुकाबला करण्याची ताकद वाढते तसेच त्यांच्या ताणाचे कारण जाणून ती कारणे दूर करण्यासाठी उपायही शोधता येतात.

▪️उपचारपद्धती :
अ) संगीत संगीतामुळे एकाकीपणाची भावना नष्ट होऊन सकारात्मक विचार रुजायला मदत होते.
आ) वाचन वाचनामुळे नकारात्मक विचार दूर होण्यास
मदत होते. विशिष्ट प्रकारची पुस्तके आवर्जून वाचायला हवीत. वाचनामुळे जगण्याची आशा वृद्धिंगत होण्यास, स्वतःची मते व्यक्त करण्यास मदत होते. वाचनामुळे विविध अडचणींवर कशी मात करायची, कठीण प्रसंगांना सामोरे कसे जायचे हे समजून आत्मविश्वास निर्माण होतो.
इ) चित्रकला स्वतःला पाहिजे तसे कोणत्याही विषयावर चित्राद्वारे अभिव्यक्त होण्यास मदत होते. त्या चित्रामध्ये मनाजोगे रंग भरता येतात. चित्रात मन रमून गेल्यामुळे ताणतणावापासून थोडा काळ तरी मुक्तता मिळते व शरीर ताजेतवाने राहते.
ई) निसर्ग: शाळेत किंवा भोवतालच्या परिसरात लहानशी बाग असल्यास तेथे झाडे लावणे, त्या झाडांचे रक्षण करणे, त्यांची देखभाल करणे या कामांमुळे मन व शरीर ताजेतवाने होते. मातीच्या व पाण्याच्या स्पर्शाने मन आल्हाददायी होते. स्वतः लावलेल्या झाडांना फळे, फुले आली तर मन प्रफुल्लित होते.
उ) ज्ञानरचनावाद : बालस्नेही मेळावा आयोजित करणे. या मेळाव्यात सर्व विद्यार्थ्यांना भाग घेण्यास लावणे. त्यामुळे त्यांना स्वतः कृती करण्याचा आनंद घेता येईल. विविध क्षेत्रांत भाग घेण्याची वृत्ती त्यांच्यात निर्माण होईल व ते ताणतणावापासून दूर राहतील.
ऊ) मूल्यवर्धन कार्यक्रम मूल्यसंवर्धनासाठी पूरक असे विविधरंगी कार्यक्रम राबविणे, जेणेकरून विद्यार्थी हिरिरीने भाग घेऊन त्यामध्ये रमतील व ताणतणावापासून दूर राहतील.
शिक्षकांनी अध्ययनाचा अनुभव देताना विद्यार्थ्यांची आवड व छंद लक्षात घेऊन सहशालेय कार्यक्रम तसेच अभ्यासपूरक कार्यक्रम राबविले पाहिजेत. यामध्ये शिक्षकांची सर्वांत महत्त्वाची व केंद्रस्थानी भूमिका असते कारण विद्यार्थ्यांचा खरा हिरो हा शिक्षकच असतो, तोच विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करू शकतो.
विज्ञानामध्ये " दाब व प्रतिदाब "असे म्हटले जाते त्यासाठी मूल्य शिक्षण संस्कार शिक्षण कुटुंबातील शिक्षण याच्या आधारावर असतो ठामपणे उभा राहणार आहे. एकविसाव्या शतकातील आव्हान जगासमोर येऊन टाकले आहेत त्या आव्हानांना सर्वसामान्यपणे व अभ्यासपूर्ण तोंड देण्यासाठी पालक व शिक्षक यांच्या सहकार्यानेच व योग्य मार्गदर्शनाने तो सक्षम बनणार आहे व देशाचे तसेच जगाचे नेतृत्व करण्यास कटिबद्ध राहणार आहे.

 ✍️ डॉ अजितकुमार पाटील, कोल्हापूर.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes