+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule02 Apr 24 person by visibility 257 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी ऊर्जा साठवण्यासाठी प्रथमच उपयोगात येणाऱ्या नावीन्यपूर्ण ‘डिस्प्रोसियम सल्फाईड फिल्म्स’ बनविण्याच्या ‘सीबीडी’ या रासायनिक पद्धतीसाठी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडून पेटंट मंजूर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ४० वे पेटंट आहे. 

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे रिसर्च डायरेक्टर व अप्लाईड फिजिक्स या विषयामधील नामांकित संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित केलेल्या या ‘सीबीडी’ पद्धतीसाठी पेटंट मिळवण्याबाबत भारत सरकारच्या पेटंट प्रमाणपत्र कार्यालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार मार्च २०२४ रोजी संशोधकांच्या नावे हे पेटंट मंजूर झाले आहे. या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्ण ऊर्जा साठवणुकीची पद्धत पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाईल. 

मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, सदर शोध पद्धतीद्वारे तयार केलेल्या पातळ फिती या ऊर्जा साठवणुकीसाठी बनवल्या जाणाऱ्या विद्युत घट तसेच सुपरकपॅसिटर मध्ये अत्यंत प्रभावी व कार्यक्षम आहेत. या क्षेत्रात सातत्यपूर्ण संशोधन सुरु आहे. 

या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे व यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी संभाजी खोत, डॉ. वैभव लोखंडे यांचा सहभाग होता. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.