SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या सोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठककोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : वारे वसाहत, संभाजीनगर परिसरामध्ये सत्यजित जाधव यांच्या प्रचारार्थ फेरी इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक सात मधून मनीषा घोटणे यांच्या प्रचारास प्रारंभइंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्सच्या सदस्यपदी डॉ. अश्विनी जयंत काळेएमपीएससी गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 53 केंद्रावर सुरळीतप्रभागाच्या विकासासह समाजकार्याचा वारसा जोपासण्यासाठी राजकारणात : ओंकार जाधवकोल्हापूर महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात केंद्रनिहाय मतदार यादी नागरिकांसाठी उपलब्धदिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात : सत्यजित जाधवकोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात मित्राकडून मित्राच्या डोक्यात दगड घालून निघृण खूनकोल्हापूरकरांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी महायुती : रवींद्र चव्हाण; कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ

जाहिरात

 

यशवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ उत्साहात

schedule18 Apr 24 person by visibility 376 categoryशैक्षणिक

 कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत आज संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे शासकीय महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक (इयत्ता ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षा मधील राज्यस्तर, जिल्हास्तर मध्ये दैदिप्यमान कामगिरी केलेले विद्यार्थी, महापालिका छत्रपती राजर्षी शाहू शिष्यवृत्ती परीक्षा, कोल्हापूर प्रज्ञाशोध परीक्षा मधील यशवंत ९१४ विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार ट्रॉफी व मेडल देवून करण्यात आला. तसेच ७२ व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा सन २०२३-२४ मधील सर्वसाधारण विजेता पदाची आकर्षक ट्रॉफी मनपा लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर या शाळेस प्रदान करण्यात आली.

 यावेळी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उपायुक्त साधना पाटील, प्रशासनाधिकारी शंकर यादव, जेष्ठ साहित्यिक डॉ. जी. पी. माळी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणीक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, मनपा शिक्षक संघटनेचे सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील, विलास पिंगळे, राजेंद्र पाटील, दिलीप माने, डी. मार्ट सी.एस.आर. चे लक्ष्मण यादव यांचे हस्ते यशवंत ९१४ विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अजय गोसावी, अविनाश लाड, शांताराम सुतार उपस्थित होते.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी केले. या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे नियोजन प्र.कनिष्ठ लिपिक संजय शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन आर.जी. किर्तीकर, सारिका पाटील, मनीषा पांचाळ यांनी केले. उपस्थितांचे आभार शैक्षणीक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांनी मानले. यावेळी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांचे लिखित अक्षरब्रम्ह या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तर पुस्तकाचे परिचय सहाय्यक शिक्षक सुधाकर सावंत यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes