SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधआरोग्य विभागाच्या ताफ्यात दोन जेसीबीची भर; नवीन जेसीबी थ्रीडी एक्स बॅकहो लोडरचे लोकार्पणविज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्माडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राधिकाचे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णयशगोकुळच्या ४९२ दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीगौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जजयसिंगपुरात १० ऑक्टोबरला ऊस परिषद ! १५ ऑक्टोबरच्या साखर गळीत हंगामाला 'स्वाभिमानी'चा सक्त विरोधभविष्याची ढाल: जागतिक ओझोन संरक्षण दिनकोल्हापुर महानगरपालिका : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर १५ दिवसांत २२२ जणांवर कारवाईगोकुळ पंचवार्षिक निवडणूक : शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुट्टी

जाहिरात

 

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंध

schedule16 Sep 26 person by visibility 146 categoryराज्य

 कोल्हापूर : जिल्हयामध्ये गणेश उत्सव हा सण पारंपारिक पध्दतीने व मोठ्या उत्साहाने 14 ते 25 सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाणार आहे. या गणेश उत्सव कालावधीत गणेश मंडळ, तालीम संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी मिरवणुका पाहण्याकरीता मोठ्या प्रमाणात आबालवृध्द, महिला, मुलींची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सदर मिरवणुकी दरम्यान ड्रोनव्दारे शुटींग करतेवेळी गणपती मिरवणूक पाहण्यास येणारे लोक ड्रोनच्या दिशेने आपले शुटींग व्हावे या उद्देशाने एकाच ठिकाणी थांबून बराच वेळ रेंगाळतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावर चेंगराचेंगरी अथवा धक्काबुक्की होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

   त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये, जिल्हयामध्ये गणेश उत्सव कालावधीत गणेश मंडळ, तालीम संस्था यांच्याकडून गणपती मुर्तीचे आगमन व विसर्जना दरम्यान काढण्यात येणा-या मिरवणुकीच्या वेळी ड्रोन कॅमेरा उड्डाण व चित्रीकरणास 14 ते 26  सप्टेंबर रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रतिबंध (बंदी) केला आहे.     
        
     सदरचा आदेश कायद्या व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नेमलेल्या अधिकारी व कर्मचारी व त्यांना नेमून दिलेल्या कामकाजासाठी हातळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes