कोरे डिप्लोमा मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आरटीओ कॅम्पचे आयोजन...
schedule14 Oct 25 person by visibility 86 categoryसामाजिक

वारणानगर :तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिप्लोमा), वारणानगर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांचे वतीने आरटीओ कॅम्पचे आयोजन करणेत आले होते. या कॅम्प साठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी यांनी प्रोत्साहन दिले. तसेच संस्थेचे प्राचार्य प्रा. पी. आर. पाटील व मार्गदर्शक डॉ. पी. एम. पाटील यांचे सहकार्य लाभले.
या कॅम्पसाठी अनुपमा पुजारी, हिना सौदागर मोटर वाहन निरीक्षक आर. टी. ओ . कोल्हापूर व स्वरूपा नांगरे-पाटील सहायक मोटर वाहन निरीक्षक आर. टी. ओ. कोल्हापूर हे उपस्थित होते . ह्याचे स्वागत काॅलेजचे प्राचार्य पी.आर. पाटील यांनी केले, त्या नंतर सर्व लायसन्स धारक व्यक्तीना मोटार वाहन नियमांचे माहिती देण्यात आली तसेच शिकाऊ व कायमस्वरूपी वाहनचालक परवाना वितरित करणेत आला. त्याचबरोबर दोन चाकी आणि चार चाकी गाडीचे रिपासिंग करणेची सुविधा उत्फुर्त सहभाग नोंदवला. उपलब्ध करून देणेत आली होती.
या कॅम्प साठी महाविद्यालयातील विद्यार्थी व भागातील नागरिकांनी कॅम्पचे समन्वयक म्हणून प्रा. एस. एस. चव्हाण जिमखाना प्रमुख व प्रा. टि. ए. पाटील समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.