सैनिक कल्याण कार्यालयात 72 लिपिक टंकलेखक पदांची भरती
schedule14 Oct 25 person by visibility 91 categoryराज्य

कोल्हापूर : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण 72 पदांकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरील पदांपैकी 1 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता, उपलब्धतेनुसार भरण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी पत्रकान्वये दिली.
प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. पात्र उमेदवारांनी वेब-बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन (Resources Tab ---> Recruitment Tab येथे 14 ऑक्टोबर रोजी सकाळी11 वाजल्यापासून ते 5 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर वेबलिंक बंद होईल, अशी माहिती कार्यालयामार्फत देण्यात आली.