तालुका लोकशाही दिनाचे 24 ऑक्टोबर रोजी आयोजन
schedule14 Oct 25 person by visibility 50 categoryराज्य

कोल्हापूर : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुका लोकशाही दिन साजरा करण्यात येतो.
या अनुषंगाने तालुका प्रशासनामार्फत महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी स्थानिक सुट्टी असल्याने तसेच दि. 21 ते 23 ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालय, कागल येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
नागरिकांनी शासकीय कामकाज अनुषंगाने लेखी स्वरुपात दोन प्रतीत तक्रारी सादर कराव्यात, असे आवहन कागलचे तहसिलदार अमरदिप वाकडे यांनी केले आहे.