SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, चौघे जखमीअजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, चौघे जखमीताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवनइमारत देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १९४ कोटी रुपयांच्या निधीचे वितरणनवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; २३ नोव्हेंबर पर्यंत प्रदर्शनाचे आयोजनसंशोधनाचे पेटंट घेऊन व्यावसायीकरण करणे महत्त्वाचे : डॉ. डी. टी. शिर्केकोल्हापूर जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यंत बंदी आदेश लागूकोल्हापूर जिल्ह्यातील नगर पालिका निवडणूक लढती स्पष्ट; उमेदवार लागले प्रचाराला..ज्येष्ठ संशोधक काशीनाथ देवधर यांचे मंगळवारी विद्यापीठात विशेष व्याख्यानकोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीतील कामाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

जाहिरात

 

प्रथम वर्धापन दिन : एसएमपी न्यूज नेटवर्कचा तेजोमय प्रवास; वर्षभरात साडेसहा लाख व्हिजिटर्सचा टप्पा

schedule26 Oct 22 person by visibility 1196 categoryसंपादकीय

गतवर्षी दीपावली पाडव्याचा तेजोमय मुहूर्त साधत कोल्हापुरात दिमाखदारपणे एसएमपी न्यूज पोर्टलचा प्रारंभ झाला. गतवर्षातील वाटचालीकडे मागे डोकावून पाहत असताना अनेक सकारात्मक काही आव्हानात्मक प्रश्न उभे ठाकले मात्र आव्हानाला सामोरे जात असताना प्रबळ इच्छाशक्ती आणि वाचक, जाहिरातदार यांचे पाठबळ लाख मोलाचे ठरले असेच म्हणावे लागेल. गतवर्षी दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूरकरांच्या सेवेत दिमाखात रुजू झालेल्या एसएमपी न्यूज पोर्टलने आज दीपावली पाडव्याला प्रथम वर्धापन दिन साजरा करत असून साडेसहा लाख व्हिजिटरांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच एसएमपी न्यूज नेटवर्क युट्युब चॅनेल ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

करवीरनिवासीनी अंबाबाई, दक्खनचा राजा जोतिबाची कृपा, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू राजांच्या पदस्पर्शनि पुनित झालेल्या या भूमीला ऐतिहासिक आणि पुरोगामी विचार अंगिकारलेल्या करवीरनगरीत गतवर्षी आम्ही या क्षेत्रामध्ये पदार्पण केले त्यावेळी कोरोना संकटानंतर परिस्थिती अनलॉक होऊन उद्योगधंद्याचे चक्रे फिरू लागली होती आणि हळूहळू अर्थ व्यवस्था सावरू लागली होती. अशा परिस्थितीत आम्ही उचललेले पाऊल आव्हानात्मक होते पण कष्ट करण्याची तयारी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आम्हाला करवीर नगरीतून मिळाले. 

वृत्तपत्र श्रेत्रातील अनुभव पाठीशी असला तरी डिजिटल मीडियाचा क्षेत्र आमच्यासाठी नवीन होते. मात्र बदलत्या स्वरूपात काम करतानाची सवय आम्हाला होऊन गेली. यातून वाचक वर्ग जोडला गेला त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क अथवा मोबाईल वरती सामाजिक राजकीय शैक्षणिक आदी प्रश्न बाबत होणारे संभाषण, एसएमपी न्यूज विषयी व्यक्त होणाऱ्या भावना आम्हाला प्रेरणादायी, मार्गदर्शन, आणि विश्वास वाढणाऱ्या ठरल्या.

सामाजिक, राजकीय, औद्योगिक, वैद्यकीय, क्रीडा आदी क्षेत्रातील बातम्या आम्ही निष्पक्ष, परखडपणे मांडणी करत असताना त्यातील अचूकता टिपण्याचा आम्ही प्रयत्न केला. यामुळे वाचकांची विश्वासार्हता वाढली यामुळे वाचक हितचिंतक यांचे पाठबळ आम्हाला आमच्या एस एम पी न्यूज नेटवर्कच्या 'एकच लक्ष... सदैव दक्ष' या बिद्र वाक्याप्रमाणे सार्थकी ठरवू शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भविष्यातील आव्हानात्मक कार्य आपल्या पाठबळाच्या जोरावर नक्कीच पेलू शकू असा विश्वास आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes