SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारककर्करुग्णांसाठी मोठा दिलासा विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेशपदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्ककौशल्यातूनच जागतिक नेतृत्व शक्य : प्रा. डॉ. भीमराया मेत्री३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत मुद्दल न भरल्यास ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करणारगरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस: कारण, महत्त्व आणि संकल्पप्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.3 राजारामपुरी व केंद्र क्रं.4 पंचगंगा या आरोग्य संस्था गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय मानांकनास पात्रकोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘फ्युचर रेडी इंजिनिअर ’ कार्यक्रमाचा समारोप'गोकुळ' निवडणुकीत विश्वासाचा घात; महायुतीचे नेते स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर अविश्वासी : आ. सतेज पाटील यांचा घणाघातपुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कौस्तुभ गावडे यांची सोलापूरमध्ये दमदार मोर्चेबांधणी!

जाहिरात

 

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना डीबीटीसाठी बँक खाते व आधार लिंक करा : उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी

schedule19 Jul 24 person by visibility 750 categoryराज्य

कोल्हापूर :: संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण महाडीबीटी प्रणालीव्दारे करण्याच्या शासनाच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत.

 या योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीव्दारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत नसतील त्यांची आधार वैधता होणार नाही, तसेच लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यासोबत संलग्न असणे आवश्यक आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आपले आधारअद्ययावत करावे तसेच आधार क्रमांक बँक खात्यासोबत संलग्न करुन घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी केले आहे.

पात्र लाभार्थ्यांची माहिती महाडीबीटी प्रणालीवर भरुन त्यावर त्यांच्या आधारची वैधता तपासावयाची आहे. आधार क्रमांक बँक खात्यासोबत संलग्न नसल्यास लाभार्थ्यांना त्यांचा लाभ प्राप्त होणार नाही.

 त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांनी आपले बँक खाते असलेल्या बँकेत जाऊन आधार क्रमांक बँक खात्यासोबत संलग्न करुन घ्यावा किंवा जवळच्या आधार सुविधा केंद्रात जाऊन आपले आधार अद्ययावत करुन घेण्याची कार्यवाही विनाविलंब करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes