शिवाजी विद्यापीठाच्या युजी आणि पीजी संघाचे आंतररविभागीय महिला सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्णपदक
schedule10 Jan 25 person by visibility 271 categoryक्रीडा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या आंतररविभागिय महिला सॉफ्टबॉल स्पर्धा कराड येथील वेणूताई चव्हाण कॉलेजवर पार पडल्या या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या युजी आणि पिजी डिपार्टमेंटच्या महिला खेळाडूंनी अत्यंत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागाचे संघाने प्रथमच या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवून शिवाजी विद्यापीठात इतिहास घडविला.
विजयी खेळाडू खालील प्रमाणे 1. स्वप्नाली वायदंडे, 2. धनश्री कांबळे, 3. सदिया पटेल, 4. तब्बसुम छडेदर, 5. अपूर्वा पाटील, 6. तनुजा कदम, 7. अश्वर्या पुरी, 8. पौर्णिमा हिटमुडे, 9. करिष्मा कुडचे, 10. पल्लवी कांबळे, 11. प्रियांका अंची, 12. निशा अवळे
या खेळाडूना विद्यापीठाचे मा कुलगुरू डॉ डी टी शिर्के, प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदेन, क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन मिळाले आणि प्रा सुचय खोपडे, डॉ राजेंद्र रायकर, प्रा किरण पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.