पंचगंगा रुग्णालयाच्या परिसरात 100 दिवसीय टिबी मुक्त भारत अभियानाचे पथनाट्य
schedule05 Feb 25 person by visibility 263 categoryआरोग्य
![](_smpnewsnetwork.com/u/pos/202502/smp1001490054--800.jpg)
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रं.4 व पंचगंगा रुग्णालयाच्या वतीने 100 दिवसीय टि.बी. मुक्त भारत अभियानाअंतर्गत आज आशा स्वयंसेविका यांनी पथनाट्य सादर केले.
हे पथनाट्य पंचगंगा रुग्णालयाच्या परिसरात करण्यात आले. या पथनाट्याद्वारे टि.बी या रोगांचा प्रसार कसा होतो, याची लक्षणे कोणती, हि लक्षणे दिसताच कोणती खबरदारी घ्यावयाची, त्याचे निदान व उपचार कसे केले जाते, शासनाकडून मोफत औषधे व दिला जाणारा भत्ता याविषयी माहिती पथनाटयाद्वारे करुन देण्यात आली.
तसेच वेळीच निदान व उपचार घेतलेने टि.बी. रोगांवर 100 टक्के मात करता येते याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आले.
या पथनाट्यासाठी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रं.4 कडील वैद्यकिय अधिकारी डॉ.रुपाली यादव, डॉ.राजेश औंधकर, नोडल ऑफिसर डॉ.अमोल माने, डॉ.हांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच केंद्राकडील एएनएम व आशा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले.