डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात
schedule10 Jan 25 person by visibility 371 categoryक्रीडा
![](_smpnewsnetwork.com/u/pos/202501/smp1001416572--800.jpg)
कोल्हापूर : चित्तथरारक सामने, ऊर्जा आणि कौशल्याने स्पर्धा करणारे खेळाडू, उत्सुकता, खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन अशा उत्साही वातावरणात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. क्रिकेट , फुटबॉल, बुद्धिबळ (चेस) बॅडमिंटन , कॅरम , टेबल टेनिस अशा सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक एस. व्ही. बनसोडे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. याप्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी , इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, प्रा. किरण पाटील, रजिस्ट्रार अमित आवाड, क्रीडाप्रमुख ऋषिकेश मेथे , क्रीडा समन्वयक प्रा. साजिद नाईक, प्रा. मृणाल पवार , शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी,खेळाडू उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी संचालनासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्रा. शुभांगी गावडे, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -
▪️क्रिकेट : विजेता -आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभाग, उपविजेता - कॉम्प्युटर इंजीनियरिंग विभाग. फुटबॉल: विजेता- आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभाग, उपविजेता -सिव्हिल इंजीनिअरिंग विभाग.
▪️बुद्धिबळ: विजेता-आदित्य संजय टक्के, समृद्धी गिरीश कुईगडे. उपविजेता- निलय सचिन पोतुडे, दिव्या दत्ताजी पाटील
▪️कॅरम : विजेता - साद मुजावर ,सुजल कारंडे, सिद्धीका सावंत, अनुष्का ओतारी
उपविजेता- स्वयम खोत, अथर्व खाडे, रक्षिता अंबी, अमृता निकम
▪️टेबल टेनिस : विजेता - तानिया उमेश काटीगर, विराज मीनल मुसळे
उपविजेता : अनन्या संजय पोवार,निलय सचिन पोतुडे
▪️बॅडमिंटन : विजेता- तानिया उमेश काटीगर,सागर किरण भिडे
उपविजेता- अनन्या संजय पोवार, ऋषिकेश युवराज अडुरकर