पाडव्याची गोडी वाढविण्यास व्यापारी वर्ग सज्ज : आकर्षक सजावट, विविध सवलती, योजनाची ग्राहकांना भुरळ
schedule02 Nov 24 person by visibility 376 categoryउद्योग

कोल्हापूर : दिवाळी पाडव्याला खरेदी म्हणजे पाडव्याचा गोडवा वाढविणारा दिवस. विविध सवलती, योजना आणि कंपन्यांच्या ऑफर्स या माध्यमातून दिवाळी पाडव्याच्या खरेदीची गर्दी केंच करण्यासाठी सर्वच व्यापारी वर्ग सज्ज झाला आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एकचांगला मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडवा. या दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने विविध वस्तूंच्या खरेदीला जणू उधाणच येते. चारचाकी, दुचाकी वाहनांसह आता इलेक्ट्रिक बाईकला पसंती मिळत आहे. त्याचबरोबर सोने- चांदी खरेदीसह बदलत्या काळानुरुप मोबाईलला वाढती मागणी आहे. त्यानुसार विविध कंपन्यांनी आपल्या वस्तूंची विक्री वाढावी, ग्राहकाने आपल्याला पसंती द्यावी यासाठी विविध सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. शिवाय विविध फायनान्स कंपन्यांनीसुध्दा ग्राहकांच्या पसंतीनुसार इएमआय सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
कंपन्यांकडून मिळत असलेल्या सवलती आणि योजनांच्या माध्यमातून ग्राहकराजा आपल्याकडेच आकर्षित व्हावा यासाठी आकर्षक सजावट केली आहे. साहजिकच ग्राहक वर्गामध्ये हे खरेदी बाबत उत्साह असून मोठी उलाढाल बाजारपेठेत अपेक्षित आहे.
