SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेकोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’; ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरणदीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्रडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन

जाहिरात

 

शनि शिंगणापूर गावात चोरी : श्रद्धेवरच प्रश्नचिन्ह?

schedule16 Jul 25 person by visibility 644 categoryराज्य

✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर

पंचवीस तीस वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर हिंदी भाषेतील 'सुरभी' या मालिकेने घराघरात लोकप्रियता मिळवली होती. देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण घटना,काही प्रसंग व अविश्वास बसणार नाही अशा वास्तव गोष्टींची माहिती रंजक पद्धतीने दिली जात होती, आज या 'सुरभी' मालिकेची आठवण ताजी झाली, यांचं कारण असं की, त्याच कार्यक्रमात शनी शिंगणापूर गावात शनीदेवावर ग्रामस्थांची प्रचंड श्रद्धा असून शनी कृपेने इथघरांना दरवाजे व कडी कोयंडे कुलुपे नसतांनाही इथे कसल्याही प्रकारची चोरी होत नाही, ही आश्चर्याची गोष्ट या छोट्या पडद्यावर दाखवली गेली, आणि संपूर्ण महाराष्ट्रासह इतर प्रांतातील शनी भक्तांची प्रचंड गर्दी या गावात होऊ लागली.

 अनेकांनी या नवलयुक्त आश्चर्यचकित करणाऱ्या गावांसंबंधी प्रसारमाध्यमांनी प्रचंड प्रसिद्धी ही दिली.शालेय विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाच्या चाचणी परीक्षेत "महाराष्ट्रातील कुठल्या गावात एकाही घराला कडी-कोयंडा नाही?" हा हमखास प्रश्न विचारला जाऊं लागला . अर्थात त्याचे उत्तर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिदेवाचे जागृत देवस्थान असलेले शनि शिंगणापुर हे गाव.  या गावात शनिदेवाचे अस्तित्व असल्याने येथे चोरी होत नाही, त्यामुळे घरांना कडी कोयंडा लावण्याची गरज भासत नाही असे मानले जाते. मात्र या श्रद्धेला तडा जाणारी चोरीची घटना नुकतीच या शनि शिंगणापूर गावात उघडकीस आली आहे. 

या गावातील शनि मंदिराचे कामकाज पाहणाऱ्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी आणि अधिकान्यांनी शनि देवाची भीती न बाळगता अंदाजे ५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा केला असल्याचे उघडकीस आले आहे. धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालातून ही गोष्ट समोर आली आहे. देवस्थानच्या विश्वस्तांनी बनावट मोबाईल ॲपद्वारे पूजा आणि देणग्यांच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळलेच पण देवस्थानात २५० च्या आसपास कर्मचारी कार्यरत असताना कागदोपत्री २४४७ कर्मचारी दाखवून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे.

ज्या शनि शिंगणापूर गावात चोरी होत नाही म्हणून गावातील घरांना कड़ी कोयंडे लावले जात नाहीत असे गर्वाने व अभिमानाने सांगितले जाते, त्यांच गावातील शनिदेवाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या या महाचोरांमुळे शनि शिंगणापूर गावात चोरी होत नाही या श्रद्धेलान तडा गेला असून इथल्या गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या श्रध्दा,भक्तीभाव  आणि परंपरेवरच एक प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes