SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावप्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूरडीकेटीईच्या सिव्हील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरीस्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची सदस्यांसह झूम प्रकल्पास भेटजनगणना 2027 अंतर्गत महानगरपालिकेमार्फत जनगणना प्रशिक्षण शिबिराचा दुसरा टप्पा पूर्णकोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहतीतील घरफोडीचा छडा; ३.४५ लाखांच्या दागिन्यांसह चोरटा जेरबंदमुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सामन्यावर लावला जात होता सट्टा; ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्तपंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर उपसाबंदीमतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावा : आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची सदस्यांसह झूम प्रकल्पास भेट

schedule05 May 26 person by visibility 84 categoryराज्य

कोल्हापूर  : स्थायी समिती सभापती विशाल शिराळे व समितीच्या सदस्यांनी सोमवारी सायंकाळी 4.00 वाजता कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पा भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी 30 TPD, २० TPD बायोगॅस प्रकल्पाही भेट देऊन चालू असलेल्या प्रकल्पाची माहिती घेतली. तसेच सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पाबाबत माहिती घेऊन योग्य ती यंत्रणा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. 

दैनंदिन निर्माण होणाऱ्या बायोगॅसद्वारे भविष्यात CNG प्रकल्प उभारून त्याद्वारे महानगरपालिकेच्या CNG टिप्परना इंधन पुरवठा करण्यासंदर्भात चर्चा झाली. सध्या याठिकाणी टिपींग फ्लोअर येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचलेचे निदर्शनास आले यावरुन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी प्रकल्प ठिकाणी प्रक्रिया संथ गतीने सुरु असून ठेकेदार यांना कच-यावर प्रक्रिया जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आर.डी.एफ. देण्यासाठी जास्तीत जास्त गाड्या पाठविण्याच्याही सूचना देण्यात आल्या. बायोमायनिंग फेज-2 चे काम जलदगतीने पुर्ण करुन कचरा कमी करावे व कचऱ्याचे विलगीकरण करण्यात यावे अशा सूचनाही देण्यात आल्या. 

यावेळी सदस्य आदिल फरास, अभिजीत मोकाशी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, शहर समन्वयक हेमंत काशीद, आरोग्य निरीक्षक मनोज लोट, प्रकल्प व्यवस्थापक नियाज अत्तार व कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes