रेकॉर्डवरील दुचाकी चोरट्याला अटक; 34 मोटार सायकली जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेची कारवाई
schedule23 Dec 25 person by visibility 160 categoryगुन्हे
कोल्हापूर : दुचाकी चोरणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 17,00,000/- रूपये किंमतीच्या एकूण 34 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
तपास पथकानी वाहन चोरीचे गुन्हयांचे ठिकाणी भेटी देवून माहिती प्राप्त करून, सी. सी. टी. व्ही. फुटेज पाहुन व इतर मिळाले तांत्रीक माहितीचे आधारे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील व रुपेश माने यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी संग्राम गायकवाड, रा. मुरगूड, ता. कागल, जि. कोल्हापूर हा चोरीची स्लेंडर मोटर सायकल घेवून हेरले, ता. हातकणंगले येथे बौध्द स्मशानभुमीजवळ येणार आहे.
मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि. 20.12.2025 रोजी हेरले, ता. हातकणंगले येथे सापळा लावून आरोपी नामे संग्राम शिवाजी गायकवाड, व.व.46, रा. मुरगूड, ता. कागल, जि. कोल्हापूर सध्या रा. तिसरी गल्ली रुकडीवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यास त्याचे कब्जातील स्प्लेंडर मोटर सायकलसह ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचे कब्जात मिळालेली स्प्लेंडर मोटर सायकल ही चोरीची असून सदर बाबत जुना राजवाडा पोलीस ठाणे, गु.र.नं. 724/2025, भा. न्या. सं.-303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल असलेची माहिती मिळाली. म्हणून त्यास सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यासह आणखीन 05 मोटर सायकल चोरीचे गुन्हे केलेची प्राथमिक माहिती दिली. नमुद आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेकडे सखोल तपास केलेनंतर मोठ्या प्रमाणात चोरीचे गुन्हे उघडकीस येवू शकतील म्हणून पोलीस अधीक्षक यांनी नमूद गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला.
सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकरवी सुरु करुन आरोपी संग्राम शिवाजी गायकवाड यास जुना राजवाडा पोलीस ठाणे, गु.र.नं. 724/2025, भा. न्या. स.-303(2) प्रमाणे दाखल गुन्हयात वि. 20.12.2025 रोजी अटक करुन त्याची दि. 23.12.2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्याचेकडे सखोल तपास केला असता आरोपी संग्राम गायकवाड याने कोल्हापूर व सांगली जिल्हयासह कर्नाटक राज्यातून एकूण 33 मोटर सायकली चोरलेची कबुली दिली. चोरीच्या सर्व 33 मोटर सायकली व गुन्हा करणेकरीता वापरलेली एक मोटर सायकल अशा एकूण 17,00,000/- रुपये किमतीच्या 34 मोटर सायकली आरोपी संग्राम गायकवाड याचे माहितीने जप्त केल्या आहेत आरोपी संग्राम शिवाजी गायकवाड याचे विरुद्ध यापुर्वी दुचाकी व चारचाकीचे असे एकूण 08 गुन्हे दाखल आहेत.
नमुद आरोपीकडून जुना राजवाडा पोलीस ठाणे, गु.र.नं. 724/2025, भा.न्या.स.-303(2) प्रमाणे दाखल गुन्हाचे तपासात वरील वाहने जप्त केली आहेत. नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे हे माहिती असून देखील त्याचेकडून चोरीच्या मोटर सायकल विकत घेणारे 01) कुणाल मनोहर कांबळे, रा. रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, 02) सुनिल रमेश खोत, रा. माणगांववाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, 03) पांडुरंग शिवाजी रानमाळे, रा. परीट गल्ली मुरगूड, ता. कागल, जि. कोल्हापूर व 04) संजय रामचंद्र शिंदे, रा. ज्ञानेश्वर कॉलनी मुरगूड, ता. कागल, जि. कोल्हापूर या चार इसमांना चोरीचा माल घेतलेबाबत त्यांना निष्पन्न केले असून त्यांचे विरुध्द पुढील कारवाई सुरु आहे. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्री. शेष मोरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, योगेशकुमार व अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी. धिरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, रामचंद्र कोळी, नवनाथ कदम, विनोद कांबळे, संजय पडवळ, अरविंद पाटील, अनिल जाधव व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.






