SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लघु उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 30 नोव्हेंबर पूर्वी अर्ज करावेतलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती मोहीम सुरु; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपास्थितीत घेतली शपथमहाराष्ट्र गौरव पुरस्कार व सुवर्ण महोत्सवी अनुदान घेणाऱ्यांनी हयात दाखला जमा करावादुसरे महायुध्द - अनुदान लाभार्थ्यांनी हयात दाखला जमा करावादेशाचे नवे सरन्यायधीश ठरले.... न्यायमूर्ती सूर्यकांत यांची केंद्राकडे शिफारसमूल्यवर्धन शिक्षण आणि सामाजिक जबाबदारीराजर्षी शाहू सलोखा मंच, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे 'निमित्त फराळाचे, स्नेह बंधुत्वाचा...' उपक्रम उत्साहातमच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचनासहर्ष टोकले बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. तर्फे, अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखान्याचे उद्घाटन

जाहिरात

 

मूल्यवर्धन शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी

schedule27 Oct 25 person by visibility 107 categoryशैक्षणिक


भारतीय राज्यघटनेने न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्ये जोपासण्याचे चे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी भारत स्वातंत्र्य होण्यापासून ते आतापर्यंतची शैक्षणिक धोरणे असतील राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत ,सर्व शालेय शिक्षण यात मूल्य शिक्षणाचा व मूल्यवर्धनाचा विचार करण्यात आला. वर्गा -  वर्गातील अध्ययन अध्यापन यामधून मूल्य रुजवण्याचे निरंतरपणे प्रयत्न सुरू आहेत.लहान विद्यार्थ्यांनाही त्यांच्या वयोमानुसार मूल्यशिक्षण मूल्यवर्धन या विषयात विचार प्रक्रिया मध्ये सहभागी करून घेण्यासाठी सहयोगी व बालस्नेही उपक्रम या मूल्यवर्धनामध्ये सुरू करण्यात आला. मुलांच्या स्वतःची स्व विकासाची आणि आपल्या असणाऱ्या जबाबदाऱ्यांची ओळख करून देत त्यामधून नातेसंबंध ,सामाजिक जबाबदारी हे शिक्षण शाळा शाळातून सुरू झाले.
 मूल्यवर्धन शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांसाठी स्वतःची जाणीव, वैयक्तिक जबाबदारी, नातेसंबंध, सामाजिक जबाबदाऱ्या या चार घटकांच्या आधारे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, नैतिक ,भावनिक, कौशल्य आणि स्वभाव गुण असलेला सुसंपन्न भारताचा नागरिक घडवणे हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इयत्ता पहिलीपासून मूल्यवर्धन शिक्षण सुरू करण्यात आले यामध्ये सामाजिक जबाबदारीचे भान हे मूल्य देत असताना त्या विद्यार्थ्यांचे वय शारीरिक वैशिष्ट्ये, भाषा ,संस्कृती, व्यवसाय वर्ग, मनुष्य धर्म अशा विविध बाबतीत विचार करण्यात आला.
 21 व्या शतकातील नागरिक घडवायचा असेल तर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणारे लोकांचे समूह व त्यांच्याशी जुळवून घेत काम करता येणे हे काळाची गरज आहे. देशातील व समाजातील विविधता स्वीकारणे,भेदभाव करण्याचे परिणाम पाहणे, लिंग भेदभाव,महिलांच्या समोरील आव्हाने महिलांचे योगदान, वीज बचत, शहरातील नागरी समस्या ग्रामीण व भागातील समस्या इत्यादींचा अभ्यास करून विद्यार्थ्यास सक्षम आव्हान पेलणारा आदर्श नागरिक बनवणे हे मोठे कार्य शिक्षकांच्या हातून घडत आहे. त्यासाठी समाजाने शिक्षक व पालक यांचा जो केंद्रबिंदू बालक आहे त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटीबद्ध राहील तर ते अशक्य जे आव्हान आहे ते शक्य होणार आहे त्यासाठी मूल्यवर्धन शिक्षण काळाची गरज आहे.
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतात आणि त्या अनुषंगाने मूल्यवर्धन
मूल्ये आणि जीवन कौशल्ये शिक्षणासाठी मूल्यवर्धन हा एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आहे.
२००९ पासून विकसित झालेले, मूल्यवर्धन हे भारतातील हजारो शाळांमध्ये यशस्वीरित्या अंमलात आणले गेले आहे.
मूल्यवर्धन हा शालेय वयाच्या पहिलीपासून मुलांमध्ये मूल्ये आणि जीवन कौशल्ये जोपासण्यावर लक्ष केंद्रित करणारा एक गतिमान शैक्षणिक उपक्रम आहे.

 सामाजिक, भावनिक आणि नैतिक मधील नवीनतम संशोधनाचा आधार घेत, मूल्यवर्धन भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद केलेल्या मूल्यांशी सुसंगत आहे.

मूल्यवर्धनमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी काळजीपूर्वक डिझाइन केलेले आणि आकर्षक उपक्रम आहेत. या उपक्रमांमध्ये आत्म-जागरूकता, जबाबदार वर्तन, सकारात्मक नाते संबंध आणि सामाजिक जबाबदाऱ्या यासारख्या विस्तृत अभ्यास करून त्या विषयांचा समावेशकरण्यात आला आहे.
*राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF):* २०२३ मध्ये नमूद केलेल्या क्षमता साध्य करण्यासाठी मुल्यवर्धन विद्यार्थ्यांना मदत करते.
मूल्यवर्धन शिक्षण म्हणजे नैतिक मूल्ये, कौशल्ये आणि स्वभाव विकसित करणे जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहे. हे शिक्षण सामाजिक जबाबदारीसोबत जोडलेले आहे, कारण मूल्यवर्धन शिक्षणामुळे व्यक्ती समाजात जबाबदारीने वागते, सामाजिक समस्यांवर चिकित्सक विचार करते आणि एक चांगला नागरिक म्हणून योगदान देते. 
*मूल्यवर्धन शिक्षणाचे महत्त्व:*
विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि चारित्र्य विकास: हे विद्यार्थ्यांना दयाळूपणा, प्रामाणिकपणा, आणि इतरांशी सहकार्य करणे यांसारखी मूल्ये शिकवते.
सामाजिक समस्यांवर उपाय: आजच्या काळात भ्रष्टाचार, अराजकता आणि इतर सामाजिक विकृतींवर मात करण्यासाठी मूल्यशिक्षण आवश्यक आहे.

जागरूक नागरिक विद्यार्थ्यांना सामाजिक भान असणारे आणि जबाबदार नागरिक बनण्यास मदत करते.
चिकित्सक विचार हे विद्यार्थ्यांना स्वतःच्या आणि जगातील घडामोडींवर चिकित्सकपणे विचार करण्यास आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास शिकवते. 
*मूल्यवर्धन आणि सामाजिक जबाबदारी* 
 शिक्षण व सामाजिक बदल हे एकमेकांना जोडलेले आहेत. शिक्षणामुळे समाजात चांगले बदल घडतात आणि यामुळे शिक्षणाचे स्वरूपही सुधारते.

सामाजिक रचना: मूल्यवर्धनामुळे सामाजिक रचना अधिक मजबूत होते, चांगल्या सामाजिक रिवाजांचे पालन केले जाते आणि पर्यावरणाचे संरक्षण केले जाते.

जबाबदारीची जाणीव: विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, समाजात स्वतःची जबाबदारी ओळखून वागण्यास शिकवणे हे मूल्यवर्धनाचे उद्दिष्ट आहे. हे त्यांना केवळ चांगले व्यक्तीच नाही तर समाजासाठी एक मौल्यवान घटक बनवते. 

मूल्यवर्धन आवश्यक आहे का?
सामाजिक मूल्ये घटनात्मक मूल्यांच्या आधारावर सुचविलेली आहेत.
राज्य घटनेतील मूल्ये मुलांमध्ये रुजावित हे शालेय शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट आहे.
भारतीय संविधानात ठळकपणे नमूद केलेल्या स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधूता या चार मुख्य मूल्यांचा मूल्यवर्धनच्या उपक्रमात समावेश केलेला आहे.
यासाठी शाळांचा, शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळणेही तेवढेच आवश्यक आहे. मूल्यवर्धन या कार्यक्रमाद्वारे शाळा हे उद्दिष्ट नियोजित व पद्धतशीरपणे साध्य करू शकतात.

भारतीय संविधान : भारतीय संविधानात ठळकपणे नमूद केलेल्या स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधूता या चार मुख्य मूल्यांचा मूल्यवर्धनच्या उपक्रमात समावेश केलेला आहे.
यासाठी शाळांचा, शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळणेही तेवढेच आवश्यक आहे. मूल्यवर्धन या कार्यक्रमाद्वारे शाळा हे उद्दिष्ट नियोजित व पद्धतशीरपणे साध्य करू शकतात.

मूल्यशिक्षणाची गरज आहे का?
व्यक्तिगत जबाबदारी : खरोखरच मूल्यशिक्षणामुळे सुसंस्कृतव्यक्ती घडविण्याचे कार्य होणार आहे. सुसंपन्न व्यक्तिमत्त्व असलेले व्यक्तीच्या ठिकाणी संयम, सौजन्य, सर्जनशीलता, शिस्त, नियमितपणा, नम्रता, नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, क्षमाशीलता, स्वावलंबन, शिष्टाचार, सर्वधर्मसमभाव, स्त्री - पुरूष समानता, राष्ट्रप्रेम या नीतिमुल्यांचे संस्कार होणार आहेत आणि आपण त्यामुळे समाजाचा एक जबाबदार घटक बनणार आहोत. म्हणून मूल्यशिक्षण गरजेचे आहे.

कौटुंबिक जबाबदारी: विद्यार्थ्यांना प्रत्येक व्यक्तिच्या ठिकाणी मातृभक्ती, पितृभक्ती, सहिष्णुता या नीतिमूल्यांची वाढ होणे गरजेचे व अपेक्षित आहे. आपल्या कुटुंबातील आपण एक जबाबदार घटक आहोत याची जाणीव होणे आवश्यक आहे. ही नीतिमूल्ये आपल्यामध्ये रूजल्या गेली की, आपण कुटुंबाची जबाबदारी लीलया पेलू शकतो  म्हणून मूल्यशिक्षण गरजेच आहे.

 सामाजिक जबाबदारी
प्रत्येक व्यक्ती समाजाचा अविभाज्य घटक आहे, जर त्याच्या ठिकाणी स्त्री - पुरूष समानता, सर्वधर्म समभाव, अहिंसा, सत्य, अस्तेय, राष्ट्रभक्ती, निसर्गप्रेम, शिस्त, आदि नीतिमूल्यांची वाढ झाल्यास तो व्यक्ती सामाजिक जबाबदारी पेलण्यास नक्कीच लायक व समर्थ ठरेल. ठरतो.अशा प्रकारच्या नीतिमूल्यांमुळे सामाजिक एकता टिकून राहते व तसेच देशात असणारी भारतीय लोकशाही बळकट होण्यास मदत होते आणि त्यामुळे देशाची प्रगती होते.नीतिमूल्यांची रूजवणूक करणारी शिक्षक व पालक हे दोन घटक महत्त्वाची मानली जातात. शिक्षक व पालकांनी नीतिमूल्यवान मूले बनविली किंवा घडविली तर काही वर्षांनी संपूर्ण समाज मूल्यवान, सुसंस्कृत झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी 'हे विश्वची माझे घर' असा मोठेपणा सर्वांनी मनात ठेवला पाहिजे.अशा प्रकारे निरोगी, आनंदी, सुखी, सुसंकृत समाधानी समाज बनविण्यासाठी आणि प्रगतीसाठी मूल्यशिक्षणाची अत्यंत गरज आहे.
*मूल्यवर्धन व शिक्षण सारांश*
: मूल्यवर्धन शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्यघटनेतील मूल्ये जसे की स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुत्व यांची रुजवण करणे हा उद्देश बाळगणारा शैक्षणिक उपक्रम आहे .

मूल्यवर्धन शिक्षणाचा सारांश:
 महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना जबाबदार, संवेदनशील आणि लोकशाही विचारसरणी असलेला नागरिक बनविणे हा आहे.
या योजनेत प्रशिक्षित शिक्षकांना "मूल्यवर्धन प्रेरक" म्हटले जाते. हे प्रेरक इतर शिक्षकांना प्रशिक्षण देतात, ज्याद्वारे मूल्याधारित शिक्षण शाळांमध्ये पोहोचवले जाते.
कार्यक्रमाचे घटक आणि उपक्रम मूल्यवर्धन कार्यशाळांमध्ये विविध घटक शिकवले जातात जसे की अध्यापन कौशल्ये आणि वर्गव्यवस्थापनसहयोगी अध्ययन आणि खेळांद्वारे,आनंददायी शिक्षण विद्यार्थी अध्ययन मूल्यांकन आणि उपक्रमांचे आयोजन.या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण, श्रमाचे महत्त्व, सामाजिक जबाबदारी, आणि सामूहिक सहभाग यांसारख्या मूल्यांचा अनुभव देण्यासाठी प्रत्यक्ष उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण,स्वच्छता, आरोग्य, वर्गशिस्त,सहकार्य, बागकाम यांसारखे प्रकल्प स्वतः करून घेतले आहेत.

 मूल्यवर्धन शिक्षण हे एकात्मिक व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थी फक्त ज्ञानच नव्हे तर चरित्र, सामाजिक जबाबदारी आणि नैतिक मूल्ये आत्मसात करतात,व त्यांना सुजाण आणि संवेदनशील नागरिक बनविण्यास मदत करते. आतापर्यंत शैक्षणिक धोरणे पाहिले असता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व भारत जगातील एका आदर्श राष्ट्र म्हणून निर्माण होण्यासाठी आदर्श शिक्षणाची विद्यार्थ्याची गरज आहे ती या अभ्यासक्रमातून साकार होणार आहे.
▪️डॉ अजितकुमार पाटील

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes