प्रभागाच्या सर्वांगीण संतुलित विकासाचे ध्येय बाळगणाऱ्या ओंकार जाधव यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद; महिलांची प्रचार फेरी
schedule10 Jan 26 person by visibility 125 categoryराजकीय
कोल्हापूर : प्रभाग क्रमांक १३ च्या सर्वांगीण, संतुलित, विकासाचे ध्येय उराशी बाळगून शिवसेना महायुतीचे उमेदवार ओंकार संभाजी जाधव निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क या आधारे प्रचाराची रणधुमाळी उडाली असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळत आहे .
प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेना महायुतीचे उमेदवार ओंकार संभाजी जाधव, माधुरी शशिकांत व्हटकर, रेखा रामचंद्र उगवे, नियाज अरिफ खान हे निवडणूक लढवत असून सामूहिक प्रचार फेरी, कॉर्नर सभा, वैयक्तिक भेटीगाठी याद्वारे महायुतीच्या उमेदवारास मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ओंकार जाधव यांच्या प्रचारार्थ आज महिला कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण मंदिर पद्मावती परिसरामध्ये प्रचार फेरी काढली यामध्ये मतदारांना भेटून ओमकार जाधव यांना विजय करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ललिता राऊत, जयश्री साळुंखे, सीमा बारड, संगीता बारड, जानवी मिस्त्री सविता माने अर्चना शिंदे आदी महिला सहभागी झाल्या होत्या .

