+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule20 Aug 22 person by visibility 1210 categoryआरोग्य
मुंबई: आरोग्य विभागाची धुरा बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. मात्र गेल्या २३ वर्षांपासून आतापर्यंत त्यांना एकही पदोन्नती दिलेली नाही. यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच 'गट अ' वर्गात सामावेश होत नसल्याने हे अधिकारी वर्षानुवर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत वैद्यकीय
अधिकारी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रलंबित प्रश्न निकाला काढून पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात व हक्क असलेली 'गट अ' ची पदोन्नती मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. अरुण कोळी व नाशिक कार्याध्यक्ष डॉ. प्रसाद साळुंखे यांनी केली आहे.

कोव्हिड पॅनडेमिक कालावधीमध्ये भारतात, टॉप-5 मध्ये महाराष्ट्र राज्याला आणण्यात सिंहाचा वाटा उचलणा-या वैद्यकिय अधिकारी गट ब (बि.ए.एम.एस.) यांच्या पदोन्नती बाबत महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष व उपेक्षा होत असल्याची खंत व तिव्र खेद असल्याचे वैदयकिय अधिकारी गट ब संवर्गात प्रचंड असंतोषासह दुःख व वेदना यांचे संमिश्रण पहावयास मिळते आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा व ग्रामीण आरोग्याचा डोलारा समर्थपणे पेलणाऱ्या व सांभाळणाऱ्या वैदयकिय अधिकारी गट ब (बि.ए.एम.एस.) यांच्या पदोन्नती बाबत मात्र महाराष्ट्र शासन गेल्या २३ वर्षापासून गप्प व निष्क्रिय असल्याचे दिसत आहे. निदान शिंदे फडणवीस सरकारने तरी या ज्वलंत प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

दरम्यान महाराष्ट्र शासनाने दि. १४ जून २०२२ रोजीच्या पत्रान्वये वैद्यकिय अधिकारी गट ब (बि.ए. एम.एस.) यांच्या सेवाज्येष्ठता व बिंदुनामावली याद्या अद्ययावत करण्यासंदर्भात आरोग्य विभागांस आदेश दिले आहेत. याच पत्रातून गट व वैदयकिय अधिकारी यांना गट अ" संवर्गात पदोन्नती देण्याबाबत लोकप्रतिनिधी व संघटनेकडून मागणी होत असून अनेक निवेदने देखील देण्यात आली आहेत. या विषयाबाबत राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण यांचे अध्यक्षतेखाली दि. २४.०२.२०२२ रोजी बैठक होऊन शासन अधिसूचना २०१९ नुसार समावेशन झालेल्या वैद्यकिय अधिकारी गट ब यांना गट अ संवर्गात समावेशन करण्याबाबत झालेली आहे. या बैठकीत राज्यमंत्री यांनी या विषयाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवालासह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागास दिले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकिय अधिकारी महासंघ संघटनेतर्फे, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांना अनेकवेळा याबाबत निवेदने देण्यात आलेली आहेत.

या निवेदनातून प्रामुख्याने वैद्यकिय अधिकारी गट अ सेवाप्रवेश नियमात सुधारणा करून मवैआसे गट ब यांना २५% पदे आरक्षित करणे. तसेच २०१९ मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकिय अधिकारी गट ब यांना गट अ मध्ये पदोन्नती मिळणे.

वरील दोन्ही प्रमुख विषयांसंदर्भात सर्वपक्षिय आमदार, अनेक लोकप्रतिनिधी, खासदार यांची शिफारसपत्रेही आरोग्य मंत्री महोदयांना देण्यात आलेली आहेत. या निवेदनांवर आरोग्यमंत्री यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजीत करण्याचे निर्देश दिलेले होते. पण आजपर्यंत आरोग्यमंत्री महोदयांच्या अध्यक्ष्यतेखाली बैठक आयोजीत करण्यात आलेली नाही.

तरी सन २०१३ सालच्या सेवा प्रवेश नियमीत बदल करण्यात येवून पूर्वीप्रमाणे नियम ४ मध्ये पदभरतीचे प्रमाण २५: ७५ करने. मागील २३ वर्षापासून बि. ए. एम. एस. वैद्यकिय अधिकारी गट ब यांच्या पदोन्नतीचा रिक्त असलेला अनुशेष आहे. सदर पदावर आज रोजी कार्यरत वैद्यकिय अधिकारी " गट ब " संवर्गातील सर्व अधिकारी यांना " गट अ " संवर्गात पदोन्नती देण्यात यावी. वैद्यकिय अधिकारी यांचा एकच संवर्ग असावा.

 निवेदने व विषयाबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात येवून योग्य ते निर्देश देण्यात यावेत. यासाठी शिंदे फडणवीस सरकारने या ज्वलंत प्रश्‍नाचे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकिय अधिकारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. अरुण कोळी, नाशिक कार्याध्यक्ष डॉ. प्रसाद साळुंखे यांनी केली आहे.