नगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्प
schedule09 Mar 26 person by visibility 110 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार नगररचना विभागाच्यावतीने बुधवार दि.11 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत एक दिवसाच्या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅम्पमध्ये महापालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या गुंठेवारी नियमितीकरण भुखंड व बांधकाम मंजुरी देण्यात येणार आहे.
तरी या कॅम्पमध्ये संबंधीत अर्जदार, मिळकतधारक, आर्किटेक्ट, इंजिनियर यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सहभागी व्हावे असे आवाहना महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात आले आहे.