डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘माजघरातील गाणी‘ कार्यक्रम मोठया उत्साहात; शब्द, सूर व ताल या त्रिवेणीसंगमावर पहाटेचे अमृतकुंभस्नान
schedule30 Mar 25 person by visibility 187 categoryसामाजिक

इचलकरंजी : प्रतिवर्षीप्रमाणे या ही वर्षी डीकेटीई च्या राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पहाटेचा ‘स्वरप्रभात-माजघरातील गाणी‘ हा खास बहारदार मराठी गीतांचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. गुढीपाडव्या निमित्त राजवाडयावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने राजवाडा उजाळून निघाला या सर्व अकर्षक रोषणाईने उपस्थितांना डोळयाचे पारणे फीटल्याची अनुभूती मिळाली.
हा कार्यक्रम डीकेटीई, आपटे वाचन मंदीर व पं.बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर केलेला होता. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलानाने पहाटे ४.३० वा झाली. गौरी पाटील यांनी राग नटभैरव सादर केला. या शास्त्रीय सुरवातीनंतर पं. बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळाचे जितेंद्र कुलकर्णी, श्रध्दा सबनीस,सृष्टी सबनीस, दीपक फडके, तीर्था कुलकर्णी, शतायु पुजारी, शिवाजी लोहार अशा कलाकारांनी एकाडून एक मराठी गीते सादर केली. या सर्वांना संगीतकार लक्ष्मण पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या वर्षी माजघरातील गाणी या शिर्षकाखाली साठ ते सत्तर वर्षापूर्वीची अवीट गोडीचे गीते सादर करण्यात आली. यातील घरगुती नात्यांच्या गोडव्याने पाडवा अधिकच गोड झाला. चैत्र पाडव्याचा ‘स्वरप्रभात‘ व ‘दीपावली पाडव्याचा‘ स्वरदीपोत्सव या दोन कार्यक्रमांच्या सातत्यपूर्ण सादरीकरणाला आता २५ वर्षे होवून गेली त्यानिमित्त गेल्या पंचवीस वर्षातील विविध आमंत्रण पत्रिका आठवण म्हणून सजावट स्वरुपात लावल्या होत्या त्या पाहून श्रोते भूतकाळात हरवून गेले. यानंतर उत्कृष्ठ वेशभूशांना विविध पारितोषीके देण्यात आली यामध्ये संभाजी महराज च्या रुपात चिन्मय श्रीकांत दळवी, माजघरातील महिलेच्या रुपात संजय काशिद, संत तुकाराम च्या रुपात प्रेमनाथ पवार, तर बाळकृष्ण रुपात श्रेयांक श्रेणीक पाटील, राधा च्या रुपात मिहीरा पाटील, वारकरी च्या रुपात आराध्या रायबागी तर हर्षदा मराठे, तेजस्वीनी वागावकर यांना नववारी साडी याचा पेहराव केला होता या सर्वांचा पारंपरिक पोषाखाबददल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, बाळकृष्ण बुवा चे उमेश कुलकर्णी,आपटे वाचन मंदीर चे सुषमा दातार, यांच्यासह माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, स्वानंद कुलकर्णी, सर्जेराव पाटील, वैशाली आवाडे, रेवती आवाडे, द्राक्षयणी पाटील, डीकेटीईच्या संचालिका डॉ एल.एस.आडमुठे, कुबेर मगदुम, अदित्य आवाडे, गिरीष कुलकर्णी यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, नागरिक, संगीत श्रोते मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा. सचिन कानिटकर यांच्या प्रभावी सुत्रसंचालनाने कार्यक्रमाला रंगत आली.