डीकेटीई राजवाडयामध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- रंग गीताचे .. सूर वेणूचे‘ कार्यक्रमाचे आयोजन
schedule08 Nov 26 person by visibility 61 categoryसामाजिक
इचलकरंजी : डीकेटीईच्या राजवाडयामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्यानिमित्त ‘ स्वरदीपोत्सव- रंग गीताचे .. सूर वेणूचे‘ हा खास मराठी गीतांचा कार्यक्रम मंगळवार दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४.३० वा डीकेटीईच्या राजवाडयामध्ये आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम डीकेटीई, आपटे वाचन मंदीर व पं.बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर होणार आहे.
सदर कार्यक्रमात प.बाळकृष्ण बुवा मंडळ यांचे कलाकार व डीकेटीईचे वाद्यवृंदाचे विद्यार्थी संगीताची कला सादर करणार आहेत. कार्यक्रमानंतर राजवाडयावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे तर यावेळच्या दिवाळीचे आकर्षण डीकेटीईच्या आयडीया लॅब मधील फिरता आकशकंदील आहे.
तरी याचा लाभ संगीत श्रोत्यांनी घ्यावा व सदर कार्यक्रमास येताना पारंपरिक पोषाखात उपस्थित रहावे असे अवाहन संयोजकांनी केले आहे.