SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील हॉस्पिटल संघांचा हॉस्पिटल प्रीमियर लीगमध्ये विजयी चौकारकागल मध्ये रविवारी जलद बुद्धिबळ स्पर्धागौरविलेल्या सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्यांची उभारणी- मंत्री आदिती तटकरेएकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवा : उपमुख्यमंत्री अजित पवारवाहतूक पोलिसांची चाणाक्ष कारवाई! — १४ वर्षीय हरवलेला विद्यार्थी सुखरूप सापडलाकसबा बावडा झूम प्रकल्पाला प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीडीकेटीईचे प्रा. जी.सी.मेकळके यांना पी.एच.डी. प्रदानमाजी सैनिक/विधवांच्या पाल्यांनी पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत कोल्हापुरात मोटर वाहन कायदयांचे उल्लंघन करणाऱ्या २८९ वाहन चालकांवर कारवाई; २५९२००/- दंड वसूललोकशाही दिनात 138 अर्ज दाखल

जाहिरात

 

‘उद्योजकतेचे रोपटे तरुणाईत रुजवण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची’ : श्रीनिवास चेटलापल्ली; केआयटीमध्ये ‘इनोव्हेशन व उद्योजकता’ कार्यशाळा उत्साहात

schedule10 Apr 25 person by visibility 754 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) व शिक्षण मंत्रालयाच्या इनोवेशन सेल तसेच केआयटी कॉलेज व केआयटीच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील प्राध्यापकांसाठी ‘इनोव्हेशन व उद्योजकता’ या विषयावर ५ दिवसाची कार्यशाळा महाविद्यालयामध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाली. 

कार्यशाळेचे उद्घाटन टेक महिंद्राच्या इनोव्हेशन विभागाचे प्रमुख चे मा.श्रीनिवास चेटलापल्ली यांनी केले.आपल्या भाषणात ते म्हणाले, “ उद्योजकतेचे रोपटे जीवनात रुजवण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असते ”. यांनी इनोव्हेशन व उद्योग जगताची भागीदारी या विषयावरती मार्गदर्शन करताना विविध पैलूंबाबत अत्यंत सखोल विचार त्यांनी उपस्थितांसमोर ठेवले.नर्मदा मॅनेजमेंट चे मुख्य सल्लागार श्री रणधीर पटवर्धन यांनी समस्यांपासून शक्यतांकडे या विषयावर मार्गदर्शन केले. आयआयटी धारवाड रिसर्च पार्क चे मुख्य अधिकारी श्री रक्षित कल्याणी यांनी सृजनशीलता आणि आयडिया जनरेशन याबाबत मार्गदर्शन केले. 

महिंद्रा युनिव्हर्सिटी हैदराबादचे  इस्माईल अकबानी यांनी ग्राहकाच्या गरजा कशा डी-कोड केल्या पाहिजेत व त्यातील कोणत्या कल्पनांना बिझनेस म्हणून किंमत दिली पाहिजे या विषयावर सत्र घेतले.  सुधीर आरळी कार्यशाळा सहसंयोजक आणि पार्थ हजारे यांनी स्टार्टअप इकोसिस्टीम व त्यातील विविध संधी यावरती उपस्थितांशी संवाद साधला. इंडोवेशन सेंटर मुंबई चे व्यवस्थापक  उमेश राठोड यांनी आर्थिक नियोजन, स्टार्टअप चे अंदाजपत्रक व निधीचा वापर या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती सत्र घेतले. गो टू मार्केट स्ट्रॅटेजी या विषयावर यशांग गोकाणी यांनी सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. अपेक्स चे सहसंस्थापक श्री सचिन कुंभोजे यांनी बिझनेस मॉडेल कॅनव्हास याचा वापर करून व्यवसाय कसा करावा ? या विषयावरती अभ्यासपूर्ण विवेचन केले. 

केआयटी चे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी कशी प्रेरणा देता येईल व त्यांच्या अभ्यासक्रमात उद्योजकतेचा अंतर्भाव कसा केला पाहिजे याविषयी अत्यंत माहितीपूर्ण सत्र घेतले.ईवोल्व्हिन्ग एक्स,पुणे चे संस्थापक श्री.अमोल निटवे यांनी प्रभावी मेन्टोरिंग  या विषयावर प्रभावी संवाद साधला. स्टार्टअप लाइफ स्टाईल हब पुणे चे अर्जुन पांचाळ यांनी गुंतवणूकदारांसमोर कशाप्रकारे आपले सादरीकरण केले पाहिजे या विषयावर उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. पेटंट व आपल्या कल्पनेचे व्यवसायिकरण या विषयावर ऍक्युअर्स आयपी केअर चे डॉ.अविनाश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. केआयटी आयआरएफ चे इनक्युबॅशन मॅनेजर श्री देवेंद्र पाठक यांनी स्टार्टअप साठी कृतीशील कार्यक्रम या विषयावर प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. अंजोरी कुंभोजे यांनी स्टार्ट अप्स मधील विविध संधी याबाबत अत्यंत माहितीपूर्ण सत्र घेतले.

या कार्यशाळेत महाराष्ट्रातील ३८ हून अधिक संस्थांतील ५० पेक्षा जास्त प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यशाळेचे समन्वयक संचालक डॉ. मोहन वनरोट्टी तर सह-समन्वयक म्हणून केआयटी आयआरएफ चे कार्यकारी अधिकारी  सुधीर आरळी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजोरी कुंभोजे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा विदुला वास्कर पाटील यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली, उपाध्यक्ष  सचिन मेनन,  सचिव  दीपक चौगुले यांचे विशेष प्रोत्साहन या कार्यशाळेच्या नियोजनासाठी मिळाले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes