SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर यांचे आवाहन...पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रकियेची फेरचौकशी : राज्यमंत्री माधुरी मिसाळपुण्यातील विनापरवाना फेरीवाल्यांबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश देणार : मंत्री शंभूराज देसाईकापूस खरेदीची मुदत 15 मार्च पर्यंत वाढविलीदिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री करिता आर्थिक सहाय्यसंजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहातधोरणात्मक निर्णयांमध्ये सर्वेक्षणांची भूमिका महत्वाची : डॉ. गीता सिंग राठोड; राष्ट्रीय अर्थमिती परिषदेची विद्यापीठात सांगतामहिलांनी विज्ञानाचे आधुनिक ज्ञान आत्मसात करावे : डॉ. अपर्णा कलावते; शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रमाची सांगता'जागतिक नागरी संरक्षण दिन'राधानगरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा मोठा दणका; जुगार अड्ड्यावर छापा टाकून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

जाहिरात

 

कापूस खरेदीची मुदत 15 मार्च पर्यंत वाढविली

schedule01 Mar 26 person by visibility 100 categoryराज्य

▪️पणन मंत्री जयकुमार रावल यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई : राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.

 या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारने राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कापूस खरेदीसाठीची मुदत 15 मार्च 2026 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

यासोबतच राज्य शासनामार्फत हरभरा खरेदी प्रक्रिया देखील 1 मार्च 2026 पासून शेतकरी नोंदणी आणि 5875 रुपये प्रती क्विंटल या हमीभावाने सुरू करण्यात येत आहे, असे पणन मंत्र्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes