टेंबे रंगमंदिरात 2 एप्रिलला होणार मानवतेचा उत्सव; स्नेहसंगीत प्रतिज्ञा उपक्रमाचा सातवा वर्धापनदिन
schedule29 Mar 25 person by visibility 333 categoryसामाजिक

कोल्हापूर : स्नेहसंगीत प्रतिज्ञा उपक्रमाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मैफिल दि 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. या मैफलीचे उद्घाटन उद्योजक अभय देशपांडे, सूर्यकांत पाटील बुध्याळकर, प्रेस क्लब चे अध्यक्ष शीतल धनवडे, सुषमा बटकडली यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे प्रशांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ध्येयसक्त आणि श्रेयमुक्त हे ब्रिद घेऊन गरजवंतांसाठी कार्यरत असणाऱ्या स्नेहसंगीत प्रतिज्ञा ने आजवर फेस बुक लाईव्ह कार्यक्रमातून समाजातील गरजूंना सहकार्य केले आहे. अधिकाधिक गरजू आणि अधिकाधिक दानशूरांपर्यंत पोचण्यासाठी या चॅरिटी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हिंदी मराठी चित्रपट गीतांवर आधारित असणाऱ्या या कार्यक्रमात 22 गायक आपली गायन कला सादर करणार आहेत.
हा कार्यक्रम समाजातील गरजवंतांसाठी आयोजित करण्यात आला असल्यामुळे 300 आणि बाल्कनी 200 असे देणगी मुल्य प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत. याचा विनियोग गरजवंतांसाठी करण्यात येणार आहे. तरी संगीतप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे नम्र आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला अभय देशपांडे, अमर राजपूत, नरहर कुलकर्णी, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.