SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पन्हाळ्यावरील शिवस्मारक कामाचा सुधारित आराखडा येत्या आठ दिवसांत, तर गगनबावडा तालुका पर्यटनाचा सूक्ष्म आराखडा महिन्याभरात सादर करा : अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका : मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केद्र पाच दिवस राहणार बंद...कोल्हापूर : कसबा बावडा त्र्यंबोलीनगर मधील चॅनलमधून चार टन प्लॅस्टिक बॉटल, गाळ व इतर कचरा उठावकोल्हापूरच्या युवकांनी कोल्हापुरातच करावा रोजगार; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन"चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ, श्री शिवाजी तरुण मंडळ विजयीशाश्वत विकासाद्वारे राष्ट्रनिर्मितीत युवकांनी योगदान द्यावे : सिद्धार्थ शिंदे डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘एआयएमए’ स्टुडंट चॅप्टरचा प्रारंभभारताला मोठा धक्का; ट्रम्प कोणत्या देशाकडून किती कर वसूल करणार... मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा ठराव लोकसभेत मंजूर लोकसभेत पहाटे २ वाजता वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर; बाजूने आणि विरोधात किती मते पडली?

जाहिरात

 

क.वाळवेच्या शितल भांदिगरे यांची म्‍हैस तर माणकापूरचे प्रफुल्ल माळी यांची गाय प्रथम

schedule02 Apr 25 person by visibility 238 categoryउद्योग

▪️‘आबाजी श्री’ अमृत महोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर; उच्चांकी १७५ दूध उत्पादकांचा सहभाग...!

कोल्‍हापूर : गेली ५० वर्ष राजकीय, सामाजिक. शिक्षण, कृषी, दुग्ध अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्य गोकुळ संलग्न दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्‍हैशी करीता ‘आबाजी श्री’ स्‍पर्धा गोकुळ दूध संघ व विश्वास पाटील अमृतमहोत्सवी गौरव समितीच्यावतीने घेण्यात आली होती.

  ‘आबाजी श्री’ या स्‍पर्धेमध्‍ये उच्चांकी १७५ म्‍हैस व गाय दूध उत्‍पादकांनी उत्‍साहाने भाग घेतल्‍याने स्‍पर्धेत चुरस निर्माण झाली होती. सदरची स्‍पर्धा दिनांक २०/०३/२०२५ इ.रोजी घेण्‍यात आली असून, त्‍यामध्‍ये श्री भैरवनाथ महिला सह. दूध व्‍याव.संस्‍था क.वाळवे ता. राधानगरी या संस्थेचे म्‍हैस दूध उत्‍पादक सौ.शितल संदिप भांदिगरे यांच्‍या मेहसाना जातीच्या म्‍हैशीने एका दिवसात सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण २० लिटर ३९० मि.ली. इतके दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला तर गायीमध्‍ये श्री भैरवनाथ सह. दूध व्‍याव. संस्‍था माणकापूर, ता.चिक्कोडी या संस्थेचे गाय दूध उत्‍पादक श्री.प्रफुल्ल राजेंद्र माळी यांच्‍या एच.एफ जातीच्या गायीने सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण ४२ लिटर ८३० मि.ली. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.

गोकुळशी संलग्‍न असणा-या सर्व प्राथमिक दूध संस्‍थांच्‍या सभासदांकरीता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘आबाजी श्री’ स्‍पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणे, जातिवंत जनावरे खरेदी करणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्‍ये दूध उत्‍पादन वाढवणे याचबरोबर दुग्‍ध व्यवसायामधुन दूध उत्‍पादकांना जास्‍तीत-जास्‍त लाभ करून देणे तसेच तरूण पिढीला या व्‍यवसायकडे आकर्षित करून दूध व्‍यवसाय वाढविणे हा असून या स्पर्धा अत्यंत निकोप व व्यवस्थीत पार पाडण्यासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. यासाठी स्थानिक गांव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थेतील संचालकांचे ही सहकार्य लाभले. या स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व ज्‍यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेले दूध उत्‍पादक अभिनंदनास पात्र आहेत व  पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या ‘गोकुळ श्री’ स्पर्धेत जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी भाग घ्यावा असे आवाहन श्री विश्वास पाटील अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.

 या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना १३ एप्रिल २०२५ रोजी विश्वास पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्य शिरोली दु. ता.करवीर येथील होणाऱ्या भव्य नागरी सत्कार कार्यक्रमामध्ये बक्षीस वाटप करणार असल्याचे विश्वास पाटील गौरव समितीच्या वतीने सांगण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes