"चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ
schedule02 Apr 25 person by visibility 270 categoryक्रीडा

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत "चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला.
यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम, पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक अॅड. वीरेंद्र मंडलिक, पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव ऋतुराज क्षीरसागर, युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, उद्योजक धैर्यशील यादव, रोनक शहा, बालगोपाल तालमीचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, कार्यध्यक्ष निवास शिंदे, सचिव राहुल चव्हाण, आप्पासाहेब साळोखे, केशव पवार, ज्येष्ठ खेळाडू रघुनाथ पिसे, बबन थोरात, गजानन पिसे, बाळासाहेब निचीते यांच्यासह तालमीचे सर्व कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनाचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर पेठ प्रासादिक वाघाची तालीम यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळने ४-० गोलने विजय मिळवला. या सामन्यात सर्वेश वाडकर यांना सामनाविरचा पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धेतील पहिला सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध रंकाळा तालीम यांच्यामध्ये खेळायला गेला. या सामन्यात पीटीएम संघाने ७-० गोलने विजय मिळवला. पीटीएम संघाच्या संदेश कासारला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.