कै. भाई नेरुळकर चषक राज्यस्तर खो-खो क्रीडा स्पर्धा अंतिम फेरीसाठी संघ निश्चित; उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज होणार बक्षीस वितरण
schedule27 Mar 25 person by visibility 184 categoryक्रीडा

कोल्हापूर : कै. भाई नेरुळकर चषक राज्यस्तर खो-खो क्रीडा स्पर्धा इचलकरंजीसाठी अंतिम फेरीसाठीचे संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये पुरुष गटात कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर यांच्यात अंतिम लढत, महिला गटात धाराशिव आणि पुणे, किशोर गटात कोल्हापूर विरुद्ध सांगली तर किशोरी गटात सांगली विरुद्ध पुणे जिल्हा भिडणार आहे.
पुरुष, महिला, किशोर व किशोरी असे सर्व विभागातील बाद फेरीचे व उपांत्य फेरीचे सामने बुधवार दि. 26 मार्च 2025 रोजी सायंकाळच्या सत्रात संपन्न झाले. आज दि. 27 मार्च 2025 रोजी पुरुष विभाग - कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर, महिला विभाग - धाराशिव विरुद्ध पुणे, किशोर विभाग - कोल्हापूर विरुद्ध सांगली तर किशोरी विभाग - सांगली विरुद्ध पुणे असे अंतिम सामने होणार आहेत.
▪️उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण
कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचा समारोप आज दि. 27 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता विठ्ठल रामजी शिंदे प्रशाला, इचलकरंजी येथे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.