डॉ. बापूजी साळुंखे इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
schedule27 Mar 25 person by visibility 412 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर येथे बी.टेक अभियांत्रिकीचा "जल्लोष 2K25" वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख श्रीराम साळुंखे, संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, तसेच विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना "विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास हाच संस्थेचा ध्यास आहे आणि शिक्षण व संस्कार यांची सांगड घालून उन्नती साधण्याचे महत्त्व" अधोरेखित केले.
श्रीराम साळुंखे यांनी "विद्यार्थ्यांच्या कलागुणांची आणि क्रीडा क्षेत्रातील यशाची प्रशंसा करत, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते" असे नमूद केले.
क्रीडा विभागाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यंदाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये इलेक्ट्रिकल (Electrical) विभागाने सर्वाधिक सहभाग आणि विजेतेपद मिळवत "सर्वसाधारण अजिंक्यपद ट्रॉफी" (General Championship) पटकावली. त्यांच्या या यशाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
स्नेहसंमेलनातील मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यामध्ये नृत्य, गायन आणि नाट्यप्रयोग यांचा समावेश होता. यामध्ये विशेष गाजलेले काही सादरीकरण पुढीलप्रमाणे .
✅ गणेश वंदना नृत्य – शुभांगी मिसाळ
✅ राम गीत गायन – प्राची शिंदे आणि समीक्षा पाटील
✅ लावणी नृत्य – प्रतीक्षा पवार
✅ दक्षिण भारतीय नृत्य संमिश्रण – अनुष्का औंदकर आणि ऋतुजा कारिदकर
✅ पंजाबी-तमिळ फ्यूजन नृत्य – शिझान आणि आर्या
प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आपली गुणवत्ता सादर करण्याची संधी उपलब्ध झाली.कार्यक्रमाच्या अखेरीस वार्षिक स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. प्रविण देसाई यांनी संस्थेच्या मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, समिती सदस्य, तसेच सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.या स्नेहसंमेलनासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक कोळेकर यांनी केले.