कोल्हापूर: विभागीय क्रीडा संकुल येथील व्यायामशाळेत प्रवेश घेण्यास मुदतवाढ
schedule04 Apr 25 person by visibility 134 categoryराज्य

कोल्हापूर : श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे इंडोकाऊंट फाउंडेशन एम. आय. डी. सी. गोकुळ शिरगाव, कोल्हापूर यांच्या सी.एस.आर.फंडातून नवीन व्यायामशाळेचे बांधकाम करण्यात आले असून या ठिकाणी अद्ययावत व्यायाम साहित्य तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लॉकर्स चेंजिंग रुम इ. सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील खेळाडू व नागरीकांना याचा फायदा होण्यासाठी प्रवेश फी भरण्यास दिनांक 10 एप्रिल 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे. जास्तीत जास्त खेळाडू व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,
असे आवाहन क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभागाचे विभागीय उपसंचालक माणिक पाटील यांनी केले आहे.