डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
schedule04 Apr 25 person by visibility 115 categoryराजकीय

कोल्हापूर : डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला कोरोची येथील मैदानावर उत्साहात सुरुवात झाली.. या स्पर्धेत डॉक्टरांचे आठ संघ सहभागी होत आहेत.
साई स्पर्श हॉस्पिटलचे डॉ.व्यंकटेश तरकसबंद, रोटरी सेंट्रलचे प्रेसिडेंट संजय भगत, प्राचार्य डॉ.महादेव नरके, नलवडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.
स्पर्धेत व्हाईट कोट वॉरियर्स सांगली, जीपीएस रॉयल किंग, तासगाव सुपर किंग, केजीएफ, सांगली सुपरस्ट्रायकर, ओशियन रायडर्स राजापूर, इस्लामपूर युनायटेड डॉक्टर्स इलेव्हन, डॉक्टर पिशवीकर इलेव्हन, डॉक्टर्स स्पोर्ट्स क्लब इचलकरंजी हे संघ सहभागी झाले आहेत. आज झालेल्या सामन्यातील सामनाविरांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.