SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हवे वाचन अन योगासने..सुंदर बनवूया जगणे...; सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे उद्या वाटपमातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देशगुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुःख व्यक्तएअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित"डेटा" हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन - श्रीनिवास पी. एम; डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘पॉवर बी. आय.’ कार्यशाळा उत्साहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून विमान दुर्घटनेची गंभीर दखल; अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजलीअहमदाबाद विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यूआषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बसपॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्यातकोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार

जाहिरात

 

कोल्हापुरात बुलबुले कुटुंबियांची बेकायदेशीर पाळीव मांजरे जप्त; कारवाई दरम्यान मांजराने कर्मचाऱ्याचा घेतला चावा

schedule11 Jun 25 person by visibility 446 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीमध्ये प्रदीप बुलबुले व त्यांची पत्नी माधुरी बुलबुले यांनी बेकायदेशीर घरामध्ये पाळीव मांजरे पाळली होती. या घरात यापुर्वी 35 पेक्षा जास्त मांजरे त्यांनी पाळली होती. यामुळे घरामध्ये दुर्गंधीयुक्त कचरा व आडगळ करुन त्यांनी ठेवल्याची स्थानिक नागरिकांकडून तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती. तसेच स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिलेली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने आयरेकर गल्लीतील बुलबुले यांच्या घरीजाऊन बेकायदेशीर पाळीव मांजरे जप्त करून घरातील दुर्गंधीयुक्त कचरा व आडगळ असा 2 ट्रॅक्टर कचरा काढला. घरामध्ये तसाच कचरा व घाण असल्याने संपूर्ण गल्लीत घाण वास येत होता.

 या कारवाईवेळी तीन मांजरे पकडली उर्वरित पाळीव मांजरे पळून गेली. ही कारवाई करताना महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यास त्यातील एक मांजर चावले. त्यामुळे या कर्मचा-यास त्वरीत उपचारासाठी दवाखाण्यामध्ये नेण्यात आले.

  सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे, नंदकुमार पाटील, सहाय्यक आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, सुरज घुणकीकर, मुकादम व कामगारांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes