SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देशगुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुःख व्यक्तएअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित"डेटा" हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन - श्रीनिवास पी. एम; डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘पॉवर बी. आय.’ कार्यशाळा उत्साहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून विमान दुर्घटनेची गंभीर दखल; अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजलीअहमदाबाद विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यूआषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बसपॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्यातकोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कारमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी ‘महाडिबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु; नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून

जाहिरात

 

कोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार

schedule11 Jun 25 person by visibility 265 categoryसामाजिक

कोल्हापूर  :   मद्य धुंद कार चालकाने पापाची तिकटी कडून बेदरकार पणे गाडी चालवत तीन महिलांना धडक दिली. 10 जून रोजी सायंकाळी ही घटना घडली. सादर कार चालकास पाठलाग करून ट्रॅफिक चे पोलीस हवालदार बेळमकर व पो. अंमलदार करनूरकर यांनी कार थांबवून पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले व मोठा अनर्थ टाळला.

तसेच पोलिस हवलदार ४३४ कोळेकर तावडे हॉटेल चौकात साधारणतः 18.00 वा. चे सुमारास कर्तव्य बजावत असताना ट्रॅफिक जाम असलेने  ट्राफिक ऑफिस कडून पेट्रोलिंग पथक क्रमांक तीन यांना बोलावून घेतले त्या मध्ये हवा. 912 भोसले व हवा. 16 49 खाडे हे तात्काळ चौकात गेले  तिघांनी मिळून पूर्ण ट्राफिक सुरळीत करून घेऊन तिघेही चौकात रहदारी नियमन करीत असताना एक मोटर सायकल स्वार याने येऊन सांगितले  कमानी जवळ एक  इसम दारूच्या नशेत  रस्त्यावर पडला आहे त्याचा अपघात होऊ शकतो जरा त्यास मदत करा असे म्हणत असता  तिघेपण लागलीच सदर ठिकाणी गेले व पाहिले तर तो इसम हातात कागद लावलेला बंडल घेऊन बसला होता.

त्यास  विचारले असता तो  म्हणाला साहेब मी माझे पैसे मोजणार आहे व त्यातील एक हजार रुपये बाजूला काढून बाकीचे पिशवीत ठेवून माझे गावी नारोली सुपा पुणे कडे जाणार आहे पण त्याची परिस्थिती नुसार आम्ही अंमलदार यांना प्रथम त्यांचे कोणी नातेवाईक मिळून येतात का ते पहा व त्यांचे  ताब्यात देणे बाबत सूचना दिल्या व्यक्तीचे नाव संपत महादू ढगे वय वर्षे 75 राहणार नारोली सुपा जिल्हा पुणे असे असून त्याचे घरी फोन करून कळवले असता त्यांनी लागलीच आमचे कोल्हापुरातील नातेवाईक किरण सुतार व महेश धनके हे तेथे येतील त्या दोघांच्या ताब्यात माझ्या वडिलांना व त्यांच्याकडे असणारी रक्कम त्यांच्या ताब्यात द्या असे त्यांचा मुलगा असे त्यांचा मुलगा सचिन म्हणत असता लागलीच सदर व्यक्तीस वरील दोन इसमांचे ताब्यात रोख रक्कम 68 हजार व कांदा विक्रीची स्लिप सह सुरक्षितपणे ताब्यात दिले. यासाठी वरील सर्व अंमलदार यांचा ट्रॅफिक ऑफिस येथे सत्कार केला

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes