कोल्हापूर शहरात शनिवारी सर्व स्ट्रीट लाईट बंद ठेवुन 'अर्थ अवर'
schedule21 Mar 25 person by visibility 392 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : वर्ल्ड वाईल्ड फंड (WWF) या संस्थेच्या आवाहनानुसार शनिवार, दि.22 मार्च 2025 रोजी 'अर्थ अवर' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पृथ्वीवरील सर्व विद्युत उपकरणे सांयकाळी 7.30 ते 8.30 एक तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिग बाबत जनजागृती व या बाबतीत लोकांचे लक्ष वेधुन घेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.
या उपक्रमांतर्गत जगातील 150 देश सहभागी होत आहेत. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकाही सहभागी होत असून या दिवशी विद्युत विभागाकडून सर्व महावितरण शाखेच्या कार्यालयास शहरातील सर्व स्ट्रीट लाईट शनिवार, दि.22 मार्च 2025 रोजी एक तासासाठी विद्युत पुरवठा खंडित ठेवण्याबाबत कळविण्यात आले आहे.
तसेच शहरातील आय.आर.बी.पथदिवे एक तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.