SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाहीभाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट, महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणूनप्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट ​"६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा अन् नवी झेप! गोकुळच्या वर्धापन दिनानिमित्त 'गोकुळ आईस्क्रीम' लाँच आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन"'पालकत्वाचा लढा होईल सोपा; पद्माराजे हायस्कूलचा मदतीचा हात!'स्वच्छ कोल्हापूरसाठी महापालिका सरसावली; सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात राबवली धडक स्वच्छता मोहीम!वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनवरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त; शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, सिलिंडरचा साठा जप्त!धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजेव्हा भारतीय पडदा पहिल्यांदा बोलू लागला...

जाहिरात

 

‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ : नविद मुश्रीफ; गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गोकुळची खास भेट

schedule29 Aug 25 person by visibility 1894 categoryउद्योग

▪️संस्था इमारत अनुदान, दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ, मुक्त गोठा योजनेत सुधारणा    

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने स्थापनेपासून नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचे धोरण अवलंबले असून, त्यांचा विश्वास जपणे हेच आपले ध्येय राहिले आहे. दूध उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे दूध संस्था व संस्था कर्मचारी सक्षम व्हावेत आणि दुग्ध व्यवसाय अधिक बळकट व्हावा यासाठी गोकुळ सातत्याने नवे निर्णय घेत असतो. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ तर्फे दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, संस्था सचिव यांना खास भेट जाहीर करण्यात आली आहे.

🔹गोकुळचे निर्णय -
▪️१. म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ -
दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने संघाशी संलग्न म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संकलन वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर १ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून दि.०१/०९/२०२५ इ. रोजी पासून जिल्ह्यातील म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ५०.५० वरून रूपये ५१.५० करण्यात आला आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये ५४.८० वरून रूपये ५५.८० करण्यात आला आहे. गाय दुधामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३२.०० रूपये वरून ३३.०० रूपये करण्यात आला आहे. या दर वाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी जवळ-जवळ साडे चार ते पाच कोटीचा जादाचा दर मिळणार आहे. सद्यस्थितीत गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतेही वाढ करण्यात आलेली नाही.

 ▪️२. संस्था इमारत अनुदान वाढ :

प्राथमिक दूध संस्था संघाचा आधारभूत घटक असून सध्या इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्य दर आणि मजुरांचे पगार वाढलेले आहेत व सध्याच्या महागाईचा विचार करता संस्थांना इमारत बांधणेसाठी किंवा खरेदी करणेसाठी आर्थिक अडचण निर्माण होत असल्याने सध्याच्या देणेत येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करणेत यावी अशी संस्थांच्याकडून वारंवार मागणी होत होती. यानुसार दूध संस्थेच्या संकलनानुसार अनुदानात रक्कमेत ८ ते १० हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

▪️३. दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ:
संस्था कर्मचारी हे दूध उत्पादक व संस्था यांच्यामध्ये दुवा असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक दूध संस्थाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रोत्साहनपर जादा दर प्रतिलिटर ५ पैशाची वाढ करण्यात येणार असून ती प्रतिलिटर ०.६५ पैसे ऐवजी ०.७० पैसे करण्यात आली आहे. याचा जवळ-जवळ ३ कोटी रुपये वार्षिक आर्थिक भार संघावरती पडणार आहे.

▪️४. मुक्त गोठा अनुदान योजना सुधारणा :
गोकुळ दूध संघाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मुक्त गोठा अनुदान योजनेत यापूर्वी किमान ५ जनावरांपर्यंत असणाऱ्या गोठ्यांनाच अनुदान दिले जात होते. ती अट शिथिल करून लहान दूध उत्पादकांनाही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून किमान ५ ऐवजी ४ जनावरे असलेल्या मुक्त गोठ्याला अनुदान दिले जाणार आहे.

 गोकुळ दूध संघाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून जवळ-जवळ १६ लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते. "गोकुळचे दूध उत्पादक हेच केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा यासाठी गोकुळ नेहमीच कार्यरत राहिला आहे. दूध उत्पादक, संस्था, सचिव, कर्मचारी प्रत्येक घटक हा गोकुळ परिवाराचा अविभाज्य भाग आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.

तसेच दि. १ सप्टेंबर २०२५ पासून या सर्व योजना लागू होतील. यासंदर्भातील अंतिम मान्यता गोकुळ संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत घेण्यात येईल. या सर्व योजनेची सविस्तर माहिती व  सुधारित परिपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना लवकरच पाठविण्यात येणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes