सैनिकांच्या गावाला विकासनिधी कमी पडू दिला जाणार नाही : आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर
schedule14 Apr 26 person by visibility 155 categoryराज्य
सैनिक टाकळी : सैनिक टाकळी व टाकळीवाडी ही दोन्ही गावे देशसेवेसाठी समर्पित आहेत. या दोन्ही गावानी दिलेले योगदान अतुलनीय आहे. अशा गावांच्या विकासासाठी काम करण्याची संधी मला मिळणे हे माझे भाग्य समजतो. देशाची सेवा करणाऱ्या कुटुंबांच्या गावांची सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. सैनिक टाकळी आणि टाकळीवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. रस्ते, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या योजनांमधून गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा प्रयत्न राहील. गावातील प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ मिळावा, यासाठी या गावांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
सैनिक टाकळी येथे ५५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच टाकळीवाडी येथे २५ लाख रुपयांच्या निधीतून बौद्ध विहार बांधकामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.
सैनिक टाकळी येथे नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योजनेतून २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच चंदुर पूल ते चंद्रकांत गायकवाड यांच्या घरापर्यंत जनसुविधा योजनेतून १० लाख रुपयांचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. तसेच टाकळीवाडी येथील बौद्ध विहारासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय खिद्रापूर रस्त्यालगत आडवाटेपासून चंद्रकांत गायकवाड यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यासाठी जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजनेतून २० लाख रुपये निधीतून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले की, सैनिक टाकळी व टाकळीवाडी या दोन गावांनी देशसेवेच्या परंपरेमुळे विशेष ओळख निर्माण केलेले आहे. या गावातील सैनिकांनी देशासाठी दिलेले योगदान अभिमानास्पद आहे. त्यामुळे या गावाच्या विकासासाठी कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य या सर्व क्षेत्रांत नियोजनबद्ध विकास केला जाईल. शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करून प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हेही प्राधान्यक्रमात राहील. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्या सहकार्याने पुढील काळात आणखी मोठी कामे उभी राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवलेल्या सैनिक टाकळीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार यड्रावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या उत्तरादेवी शिंदे, पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, दत्तवाड पंचायत समिती सदस्य बाबासाहेब वनकोरे, छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील, भवानीसिंह घोरपडे, रणजीतसिंह पाटील, विजितसिंह शिंदे, सैनिक टाकळीचे ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. तसेच माजी सरपंच डी. आर. पाटील, हर्षदा पाटील, हरिश्चंद्र पाटील, माजी सरपंच उमेशचंद्र पाटील, संभाजी गोते, अरुण पाटील, सुधीर पाटील, श्रीधर भोसले, संतोष गायकवाड, अविनाश मगदूम, तात्यासाहेब शिरहट्टी, इंजिनीयर उमेश पाटील, चंदुर गावचे अनिल पाटील यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाकळीवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य बाबासो वनकोरे, अतिकांत चव्हाण, बापूसो कोळी, वसंत गोरे, अनिल कांबळे, खुषाल कांबळे, केंदबा कांबळे, भरत पाटील, बाबासो पाटील, प्रफुल्ल निर्मळे, धनपाल कोथळी, तुकाराम चिगरे, दादासो राजमाने, अमोल चिगरे, भरमू बदामे यांच्यासह पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.