SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुंबईतील 12 अग्निशमन अधिकारी,जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान; राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटनसैनिकांच्या गावाला विकासनिधी कमी पडू दिला जाणार नाही : आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन स्थापना दिननिमित्त ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदानघुणकीत डॉ. आंबेडकर यांची १३५ वी जयंती डॉल्बीमुक्त आणि मिरवणूकमुक्त पद्धतीने उत्साहात साजरी ! दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादनतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक - डॉ. अजित कोळेकर; डी. वाय. पाटील साळोखेनगर येथे ‘इन्व्हेंटो २०२६’ उत्साहात कोल्हापूर महापालिकेच्यावतीने अग्निशमन सेवा दिन साजराकेआयटीच्या आदित्य साळुंखेस रु.२७.५० लाखाचे पॅकेज; ‘बेट्टी ब्लॉक्स ’ या आंतरराष्ट्रीय कंपनीत निवडडॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगाला प्रेरणादायक: डॉ अजितकुमार पाटीलकोल्हापूर महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जाहिरात

 

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक - डॉ. अजित कोळेकर; डी. वाय. पाटील साळोखेनगर येथे ‘इन्व्हेंटो २०२६’ उत्साहात

schedule14 Apr 26 person by visibility 100 categoryशैक्षणिक

कोल्हापूर :  सध्याच्या काळातील सामाजिक व औद्योगिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, शिवाजी विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी विभागाचे प्राचार्य डॉ. अजित कोळेकर यांनी केले. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे आयोजित ‘इन्व्हेंटो २०२६’  तांत्रिक महोत्सवच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पना आणि तांत्रिक कौशल्यांना चालना देण्यासाठी  या
उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (आय आय सी) यांच्या सहकार्याने या उपक्रम संपन्न झाला.

डॉ. कोळेकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांनी उद्योगविश्वात आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करून नव्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन केले.

कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने यांनी आपल्या भाषणात अशा तांत्रिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील रिसर्च आणि क्रिएटिव्हिटीला चालना मिळते, असे नमूद केले. 

प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विद्यार्थी केंद्रित प्रशिक्षण तसेच स्टार्टअप संबंधित उपक्रमांची माहिती दिली.

या महोत्सवात रोबोरेस, इलेक्ट्रोहन्ट, टेक उत्सव, बिल्टप मास्टर, सर्वे लीग, आयडियाथॉन, गर्ल्स ॲक्शन मेनिया, जी डी लीग, प्रेम द फेम, एआयथॉन, पिक्सेल क्राफ्ट, कोडस्लेअर, पोस्टर प्रेझेंटेशन अशा विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 

या इवेंटसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे येथील विविध अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील ९०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धांतील विजेत्यांना रोख पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे संयोजन डीन स्टुडंट वेल्फेअर गौरव देसाई यांनी केले. विद्यार्थी समन्वयक  महमदअब्सर मणेरी, मिलिंद शिंदे, कौस्तुभ पाटील, जानकी पटेल, प्रियांका मांडवकर व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमासाठी  संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील,  चीफ ऑपरेशन एक्झिक्यूटिव्ह देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने,   प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes