कोल्हापूर महापालिकेच्यावतीने अग्निशमन सेवा दिन साजरा
schedule14 Apr 26 person by visibility 148 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : सन 14 एप्रिल 1944 या दिवशी एस.एस. फोर्ट स्टिकींग जाहजला विक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भिषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमनाचे 66 जवान शहीद झाले यांच्या बलिदानाबद्ल अग्निशमन सेवा दिन व सप्ताह साजरा करण्यात येतो.
महापालिकेच्यावतीने सासने मैदान, फायर स्टेशन येथे अग्निशमन सेवा दिनानिमित्त अग्निशमन सेवा बजावत असताना प्राणाची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. या कार्यक्रमात फायर गीत, श्रध्दाजंली वाहण्यात आली.
यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता मुर्लीधर जाधव, नगरसेवक विशाल चव्हाण, नगरसेविका दिपाली घाटगे, स्वाती कांबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी दस्तगीर मुल्ला, ओंकार खेडकर, जयवंत खोत, कांता बांदेकर अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी सासने मैदान फायर स्टेशन -कावळानाका-व्हिनस कॉर्नर- लक्ष्मीपूरी-बिंदू चौक-मिरजकर तिकटी-महाद्वार रोड-पापाची तिकटी-महापालिका मुख्य कार्यालयापर्यंत अग्निशमन गाडी व दुचाकीवरुन रॅली काढण्यात आली. महापालिका अग्निशमन दलाच्या वतीने सोमवार दिनांक 18 एप्रिल 2026 पासून अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यामध्ये शाळा, कॉलेज व सार्वजनिक ठिकाणी आग्निशमन दलाची सुरक्षेच्या दृष्टीने प्रात्याक्षिके दाखविण्यात येणार आहेत.