अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा कोल्हापूर व के.एम.टी. उपक्रमाच्या वतीने आयोजित “प्रवासी दिन” उत्साहात साजरा
schedule25 Jan 26 person by visibility 136 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज “रथसप्तमी” निमित्त प्रवासी दिनाचे आयोजन श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे करणेत आले होते. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत सदस्य प्रसाद बुरांडे यांचे हस्ते के.एम.टी. बसचे पूजन करुन प्रवाशांना गुलाब पुष्प आणि तिळगुळ वाटप करुन शुभेच्छा देणेत आल्या.
ग्राहक पंचायतीच्या वतीने अधिकाधिक प्रवासी नागरिकांनी के.एम. टी. बसचा वापर करणेचे आवाहन करण्यात आले. यावेळी वाहतूक निरिक्षक नितीन पोवार, अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर अध्यक्ष विनायक वाळवेकर, उपाध्यक्ष कमलाकर बुरांडे, सुहास गुरव, सचिव प्रशांत चौगले, खजानीस सुरज कुलकर्णी, ज्येष्ठ सदस्य रविंद्र घाटगे, यांनी प्रवाशांना प्रवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास मेकॅनिकल सुपरवायझर रणधीर मोरे, लेखापाल राजू सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक नितीन पोवार, कामगार अधिकारी संजय इनामदार, कसुरी विभागप्रमुख प्रदिप म्हेतर, लेखापरीक्षक दिनेश सोमण, स्थानक प्रमुख सुनिल पाटील, वाहतूक नियंत्रक अरुण घाटगे, अपघात प्रमुख संतोष शिणगारे, तौफिक भालदार, हेमंत हेडाऊ, मारुती पोवार , विवेक साठे, तसेच के.एम.टी.च्या सर्व विभागांकडील कर्मचारी व प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.