SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहतीतील घरफोडीचा छडा; ३.४५ लाखांच्या दागिन्यांसह चोरटा जेरबंदमुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सामन्यावर लावला जात होता सट्टा; ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्तपंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर उपसाबंदीमतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावा : आमदार राजेश क्षीरसागरकागलमध्ये १७ मे रोजी जलद बुद्धिबळ स्पर्धा मे अखेरपर्यंत नाले सफाई पूर्ण करा, निवारा केंद्रांत हव्यात सर्व सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक‘गोकुळ’वर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती; संजयकुमार सुद्रीक अध्यक्षविज्ञानवादाशिवाय सामाजिक परिवर्तन अशक्य : डॉ. प्रकाश पवारकोल्हापूर महानगरपालिकेत आज 'मंगळवारी ‘जनता दरबार’ कोल्हापुरात अंबाबाई देवस्थान परिसर विकासासाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरु...

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिया

schedule13 Mar 26 person by visibility 392 categoryआरोग्य

 कोल्हापूर : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात 'मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान' राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे अभियान 9 ते 14 मार्च या कालावधीत सुरू आहे.

या विशेष अभियानांतर्गत रोटरी क्लबचे मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील नामांकित तज्ञ शल्यचिकित्सक (Surgeons) आपली सेवा देत आहेत. अभियानाच्या पहिल्या दोन दिवसांत (9 व 10 मार्च) झालेल्या शस्त्रक्रियांचा तपशील पुढीलप्रमाणे- नेत्ररोग  - 88, सामान्य शस्त्रक्रिया (General Surgery)  -96, स्त्रीरोग  - 58, अस्थिव्यंग (Orthopedic) - 20, बालरोग  - 16, कान-नाक-घसा (ENT) - 21, दंतरोग - 11 अशा एकूण 310 यशस्वी शस्त्रक्रिया  करण्यात आल्या.

जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी  उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज, सेवा रुग्णालय, कसबा बावडा (कोल्हापूर), आय.जी.एम. रुग्णालय, इचलकरंजी, ग्रामीण रुग्णालय, राधानगरी या शासकीय रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत:

 
या शिबिरास जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली. गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि 14 मार्चपर्यंत आपले नाव नोंदवून मोफत शस्त्रक्रिया करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes