पुण्यात झालेल्या २७ व्या शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज महाडिक यांचे घवघवीत यश; राष्ट्रीय नेमबाजीसाठी निवड
schedule17 Jul 24 person by visibility 438 categoryक्रीडा
कोल्हापूर : २७ वी कॅप्टन इझॅकियल शूटिंग चॅम्पियनशीप राज्यस्तरीय स्पर्धा, पुण्यामध्ये पार पडली. या स्पर्धेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, पृथ्वीराज महाडिक यांनी डबल ट्रॅप शूटिंग प्रकारात ब्रॉंझ पदकाला गवसणी घातली. या कामगिरीमुळे त्यांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत निवड झाली आहे.
चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियन स्पर्धेत, डबल ट्रिप या प्रकारात यश प्राप्त केले आहे. नेमबाजी खेळातील, डबल ट्रॅप प्रकारात आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, त्यांनी ब्रांझ पदक पटकावले. आता पृथ्वीराज महाडिक यांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पृथ्वीराज महाडिक यांना सिद्धार्थ पवार, तेजस कुसाळे, अब्दुल मिरशिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
खासदार धनंजय महाडिक आणि अरुंधती महाडिक यांच्या प्रोत्साहनातून, पृथ्वीराज महाडिक यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात अनेक क्रीडा प्रकारांमध्ये अव्वल यश मिळवले आहे. गेल्या काही वर्षात नेमबाजी खेळाच्या सरावात खंड पडला होता.
मात्र आत्मविश्वास आणि जिद्दीने नेमबाजी स्पर्धेत सहभागी होवून, त्यांनी हे यश मिळवले आहे. त्याबद्दल पृथ्वीराज महाडिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.