SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
छत्रपती शाहू वैद्यकीयनगरी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी तयार : मंत्री, हसन मुश्रीफपश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य "सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात ९ कोटींची उलाढाल, तांदळासह अन्य धान्याची उच्चांकी विक्री‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनडी. वाय पाटील मेडिकल संघाला विजेतेपद; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धाकोल्हापूर महापालिकेची उद्याने 31 डिसेंबर रोजी रात्रौ 12 वाजेपर्यंत राहणार खुलीप्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनशैक्षणिक धोरण व पायाभूत शिक्षणाची भूमिका आजऱा तालुक्यातील दुर्घटना : परोली बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यूनामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे करवीर नगरीत स्वागतकोल्हापुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती, स्फुर्ती सदन होणार

जाहिरात

 

रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यात 2 हजार 856 कोटी रुपये जमा

schedule20 Dec 24 person by visibility 147 categoryराज्य

मुंबई  : राज्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या बँक खात्यामध्ये सन 2024- 25 मध्ये 2 हजार 856.30 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती रोजगार हमी योजना विभागाकडून देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत 100 दिवसांपर्यंतची मजुरी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून दिली जाते. तर 100 दिवसांच्या वरील मजुरी राज्या शासनाच्या निधीतून दिली जाते. त्यानुसार सन 2024-25 मध्ये 100 दिवसांपर्यंत मजुरीचे 2 हजार 616.30 कोटी निधी आणि 100 दिवसांवरील मजुरीचे 240 कोटी रुपये असा एकूण 2 हजार 856.30 कोटी निधी मजुरांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून सन 2024-25 मध्ये अनुक्रमे 66.21 कोटी व 5.88 कोटी रुपये असा एकूण 72.09 कोटी इतका निधी मजुरीपोटी पालघर जिल्ह्यातील मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याची महितीही ‘रोहयो’ विभागाने दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes