डीकेटीईमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- संतवाणी संताच्या रचनांवर आधारित‘ कार्यक्रम उत्साहात
schedule23 Oct 25 person by visibility 49 categoryराज्य

इचलकरंजी : प्रतिवर्षीप्रमाणे या ही वर्षी डीकेटीई च्या राजवाडयामध्ये डीकेटीई, पं. बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ व आपटे वाचन मंदीर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगणीत करणारा ‘स्वरदीपोत्सव’ हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. दिवाळी पाडव्या निमित्त राजवाडयावर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने राजवाडा उजाळून निघाला या सर्व अकर्षक रोषणाईने उपस्थितांना डोळयाचे पारणे फीटल्याची अनुभूती मिळाली.
या दीवाळी पाडव्याचे वैशिष्टये म्हणजे राजवाडयाच्या प्रांगणात साकारण्यात आलेली मेगडंबरी जे डीकेटीईच्या आयडिया लॅब व सिव्हील विभागामध्ये तयार करण्यात आलेली होती ही मेगडंबरी हुबेहुब रायगाडावरील मेगडंबरीसारखी दिसत होती यामध्ये छ. शिवाजी महाराजांचा पुतळा शोभून दिसत होता. याशिवाय राजवाडयामध्ये लावण्यात आलेला अकाशकंदील यावर साकारण्यात आलेले युनेस्कोने जाहीर केलेले किल्ल्यांचे छायाचित्र यामुळे राजवाडा आणखिन उजळून निघत होता. चित्ताकर्षक पार्श्वभूमीवर कार्यक्रम अविस्मरणीय झाला. कार्यक्रमानंतर राजवाडयावर लावलेल्या आकर्षक अशा विद्युत रोषणाई, पणत्यांनी व झुंबरांनी मुळातच सुंदर असलेला ऐतिहासिक राजवाडा अधिकच खुलला होता. दुपारी ४.३० ते ८.०० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमांस सुमारे हजाराहून अधिक रसिक श्रोते व नागरिक उपस्थित होते.
संतवाणी कार्यक्रमामध्ये संतावर आधारीत शास्त्रीय संगीत, भावगिते, भक्तीगीते,सिनेगीते यांची माहीती करुन देणारा हा कार्यक्रम इतका रंगला की, गिरीश कुलकर्णी व त्यांच्या शिष्यांनी गायलेल्या विविध गाण्याच्या वेळी संपूर्ण श्रोतृवृंद गानसमाधीत बुडून गेला. मृणाल देशपांडे, भार्गव कुलकर्णी, डॉ सतीश दातार, डी.डी. कुलकर्णी व शिवाजी लोहार तसेच डीकेटीईचे विद्यार्थी व बालवृंदानी यांनी आपली दर्जेदार गायनकला व वादनकला सादर करुन कार्यक्रमात रंगत भरली.
कार्यक्रम संपल्यानंतर राजवाडयावर फटक्यांची आतिषबाजी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली यामुळे राजवाडयाचे सौंदर्य खुलून दिसत होते राजवाडयाचे नयनरम्य असे दृश्य पाहून उपस्थित सर्व श्रोते तसेच नागरिकांचे डोळयांचे पारणे फेडले गेले. कार्यक्रमाच्या आयोजनाबददल संगीत श्रोते व नागरिकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रमास डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे, आमदार राहुल आवाडे, ट्रस्टी डॉ ए.बी.सौंदत्तीकर, एस.डी.पाटील, स्वानंद कुलकर्णी उपसंचालक डॉ यु.जे.पाटील, आपटे वाचन मंदीरचे सौ सुषमा दातार, डॉ.कुबेर मगदुम,डॉ. सुजित सौंदत्तीकर, जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, एम डी. मनोहर जोशी, अदित्य आवाडे व पदाधिकारी यांच्यासह पं बाळकृष्णबुवा मंडळाचे पदाधिकारी व कलाकार उपस्थित होते. प्रा. सचिन कानिटकर यांच्या प्रभावी सुत्रसंचालनाने कार्यक्रमाला रंगत आली. ध्वनी व्यवस्था प्रशांत होगाडे यांची होती, विद्युत रोषणाई राजू हावळ यांनी केली.