ऐन दिवाळीत पावसाची एन्ट्री ; राज्यात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा
schedule21 Oct 25 person by visibility 119 categoryराज्य

नवी दिल्ली : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाची एन्ट्री झाली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान खात्याने (IMD) राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आता भर दिवाळीत पावसाचा ईशारा देण्यात आला आहे.
२१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकण भागाला मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, पुन्हा एकदा पावसाचा इशारा मिळाल्याने चिंता वाढली आहे.
२१ ऑक्टोबर रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
२२ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा या भागात जोरदार पाऊस पडू शकतो.
२३ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
२४ ऑक्टोबर रोजी कोकणासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. २५ ऑक्टोबर रोजी काही भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने इशारा दिला आहे.