डी. वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात ‘टेकव्हर्स २०२५’ राष्ट्रीय स्पर्धा उत्साहात
schedule08 Apr 25 person by visibility 350 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ ‘टेकव्हर्स २०२५’ ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील १८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक वक्ते विश्वजीत काशीद यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्य आणि कलागुणांना वाव देणारे ‘टेकव्हर्स’ हे उत्तम व्यासपीठ असल्याचे यावेळी विश्वजीत काशीद यांनी सांगितले.
कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन म्हणाले, विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःची कौशल्य दाखवण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच फायदा होईल. कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत म्हणाले, तांत्रिक कौशल्यांसोबतच व्यावसायिक कौशल्य अवगत करण्यासाठी या कार्यक्रमाचा चांगला फायदा होईल.
‘टेकव्हर्स २०२५’ मध्ये सहा प्रकारच्या स्पर्धा झाल्या. शांताई सभागृहात झालेल्या समारंभात विजेत्यांना लाखाची बक्षिसे प्रदान करण्यात आली. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- वक्तृत्व स्पर्धा: प्रथम-गायत्री कदम (अशोकराव माने ग्रुप ऑफ इंस्टीट्युशन, वाठार), द्वितीय-रितिका शेवडे (अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी, आष्टा), वादविवाद स्पर्धा: प्रथम – आदिश्री मिठारी, प्रीतल अनभुले, मानसी पाटील, अमुल्या टीकरे, आर्या दलाल (डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ), द्वितीय- इंद्रजा शेंडे, तृप्ती दत्तवाडे, कोडींग स्पर्धा (बिगनर्स): प्रथम- प्रतिक पाटील, समित खत्री (केआयटी, कोल्हापूर), द्वितीय- तानियान कटीगर डॉ. बापुजी साळुंखे अभियांत्रिकी, कोल्हापूर), कोडींग स्पर्धा (अॅडव्हास): प्रथम- साक्षी पाटील, संकेत कोकाटे, द्वितीय – विवेक माळी, वेदांत टोणे (सर्व डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ), फूड प्रोडक्ट डेव्हलपमेंट: प्रथम- श्रेया भोईटे, प्रणाली जाधव, ओमप्रकाश कदम( डीओटी, शिवाजी विद्यापीठ), द्वितीय- अनुष्का वळसे, ज्योतिरादित्य पांचाळ (डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ), पोस्टर प्रेझेन्टेशन: प्रथम- अनुष्का हक्के, वीर शाह (डीकेटीई, इचलकरंजी), द्वितीय- शुभम पट्टेवार, अनुज पोवार(डी वाय पाटील अभियांत्रिकी, कसबा बावडा), गेमिंग (बिजीएमआय) : प्रथम-रितिका दरीरा, मंत्रा लोहार, सम्यक खोत, अथर्व पाटील, अर्णव मिठारी(विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर), द्वितीय- सुदर्शन सांगळे, शिवराज पानारी, सौरभ कांबळे, इंद्रजीत डोंगळे( एमआयटी, छ. संभाजी नगर), गेमिंग (फ्री फायर मॅक्स)- श्रीरंग कुलकर्णी, साई पाटील, सोहन सरनोबत, दुर्वांकुर तिबिले (डी वाय पाटील अभियांत्रिकी, कसबा बावडा), द्वितीय- जयदीप मुळीक, अनिश चौगले, तुषार पाटील, पार्श्व वांजळे(डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरीग अँड मॅनेजमेंट, कोल्हापूर)
विभागप्रमुख सोमनाथ साळुंखे यांनी स्वागत केले. प्रा. शुभदा यादव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार प्रा. अभिजीत शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रथम वर्ष संगणक विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, डॉ. जयदीप पाटील, डॉ. विद्या बडदारे, समर्थ साळुंखे, उत्कर्षा वडगावकर, डॉ. एन ए. पाटील, डॉ. सदाशिव कल्याण, जयदीप पाटील शरोन काळे, ऐश्वर्या भोई, आशुतोष पाटील, श्रीधर खराडे, ऋतुजा डकरे, ज्योती सूर्यवंशी, सुनीता पवार, रेश्मा बेग, स्नेहल जगदाळे, कुणाल पाटील, संदीप राबाडे, नमिता पाटील, विशाल पुनदीकर, शंकर पुजारी, डॉ. अश्विनी माळी, शीतल पाटील आदी उपस्थित होते.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.