जलसंपदा विभागामार्फत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
schedule16 Apr 25 person by visibility 211 categoryराज्य

▪️अधिकारी-कर्मचाऱ्यांना फेरोसिंमेंट बांधकाम, शाश्वत विकास उद्दिष्टे, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोन बाबात मार्गदर्शन
कोल्हापूर : महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर, येथे जलसंपदा विभागामार्फत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ अभियानाच्या दुसऱ्या दिवशी अधिकारी व कर्मचाच्यांसाठी फेरोसिमेंट या नवीन बांधकाम पध्दतीबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत दुपारच्या सत्रात शाश्वत विकास उद्दिष्टे, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोन या बाबतचेही सत्र आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेसाठी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हात्रे, उपअधीक्षक अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता अशोक पवार, डी डी शिंदे, पूनम माने, उपकार्यकारी अभियंता शरदचंद्र पाटील, उपविभागीय अभियंता विजयसिंह राठेाड, सहायक अभियंता धनाजी पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलन आणि एम.विश्वेयवरय्या यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाली. पहिल्या सत्रात पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हत्रे यांनी कार्यशाळेचा शुभारंभ झाल्याचे सांगून प्रास्ताविक केले. यानंतर पी.पी.लेले यांनी फेरोसिमेंट या नवीन बांधकाम पध्दतीबाबत माहिती दिली तसेच याबाबत एक चित्रफीतही दाखविली. भारतातील फेरोसिमेंट बांधकामाचे जग यावर त्यांनी सादरीकरण केले. गिरीष सांगळे यांनी अंदाजपत्रक, दरपृथ्थकरण इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.अर्जुन कुंभार यांनी शाश्वत विकास उद्दिष्टे, विठ्ठल कोटेकर यांनी ट्रेस मॅनेजमेंट व पाझीटिव्ह अॅटीट्यूड बाबात व्याख्यान दिले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन सहायक अभियंता प्रशांत कांबळे यांनी केले. तर आभार अभियंता अमित अवसरे यांनी मानले.
फेरोसिमेंट हे कमी वजन त्यामुळे हलक्या आणि लांबवळकट रचनांची उभारणी शक्य होते. पारंपरिक आरसीसी पेक्षा स्वस्त, सुलभ आकारनिर्मिती वा डिझाइन सहज करता येते, जलरोधक व टिकाऊ योग्य देखभालीने अनेक वर्षं टिकते असे पी.पी.लेले यांनी सांगितले. डॉ.अर्जुन कुंभार यांनी जल व्यवस्थापन प्रक्रियेतील शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शुद्ध पाणी व स्वच्छता, शहरी व ग्रामीण भागात पाणीपुरवठा व मलनिस्सारण यंत्रणा सक्षम करणे, हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या जलव्यवस्थापन प्रणालींची उभारणी, पाण्याचे स्रोत हवामान बदलामुळे कसे प्रभावित होतात, याचा विचार करून टिकाऊ उपाययोजना करणे, शेतीमध्ये कार्यक्षम सिंचन तंत्रांचा वापर (जसे ड्रिप, स्प्रिंकलर) करून अन्नोत्पादन वाढवणे, उद्योगांमध्ये पाण्याचा पुनर्वापर, जलप्रदूषण नियंत्रण, ओढे, नद्या, तळी आणि भूजल स्रोत यांचे संवर्धन व पुनरुज्जीवन करून कामे करण्याबाबत माहिती दिली.
"तणाव व्यवस्थापन" आणि "सकारात्मक दृष्टिकोन" या दोन्ही गोष्टी आजच्या घडामोडींच्या आणि दैनंदिन आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तणाव का होतो? तणाव व्यवस्थापनासाठी उपाय, योग व ध्यान, वेळेचं नियोजन, शारीरिक व्यायाम, स्वतःशी प्रामाणिक राहणं, मन मोकळं करणं इत्यादी तर सकारात्मक दृष्टिकोन यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी टिप्स यात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काय गरज आहे? मी करू शकतो/शकते, परिस्थितीकडे संधी म्हणून पाहणं, सकारात्मक लोकांशी संपर्क, अपयश एक प्रतिक्रिया या भावनेने वागा यावर विठ्ठल कोटेकर यांनी मार्गदर्शन केले.