SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडी, हिमाचल प्रदेश यांच्यात सामंजस्य करारऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनरुग्णांना दर्जेदार सेवा द्या : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरकर्करोग जनजागृती मोहिमेस गती द्या : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरअपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरभगवान महावीर अध्यासनाला शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य: मंत्री प्रकाश आबिटकर; शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व परिसरात अध्यासन इमारतीचे भूमीपूजनघोडावतला रायझिंग स्टार ऑफ इंडिया पुरस्कार कोल्हापुरात शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी मुख्याध्यापकाने घेतली लाच कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंना 19 एप्रिल रोजी लसीकरण कार्यक्रमडी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून "टेक्नोत्सव २के२५"

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीत (स्वायत्त)२२ एप्रिलला युरेका -जिज्ञासा २के२५

schedule16 Apr 25 person by visibility 324 categoryशैक्षणिक

▪️राष्ट्रीय स्तरावरील शोध निबंध, प्रोजेक्ट व प्रेझेंटेशन स्पर्धा

वारणानगर: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान विषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालय गेली ३८ वर्षे “युरेका -जिज्ञासा’ नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजित करत असते. महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक, विभागप्रमुख यांच्या व्यवस्थापनाखाली शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये मंगळवार, दि.२२/०४/२०२५ रोजी  युरेका -जिज्ञासा २के२५ या स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्याना दोन लाखाहून अधिक रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. गतवर्षी या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून व वेगवेगळया राज्यातील १००० हुन अधिक विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता. तसेच यावर्षी सुध्दा प्रतिसाद चांगला आहे.

ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरील असून विद्यार्थ्यांच्या संशोधन व चिकित्सक वृत्ती, संवादक्षमता, सर्जनशीलता या गुणांना प्रोत्साहन देते. तसेच त्यांच्यामधील विविध कौशल्ये वृंधिगत करणेसाठी लाभदायक ठरते. यातून अभियंत्याना आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची जाणीव होते व अत्यावश्यक परिवर्तनाची माहिती प्राप्त होते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या उज्ज्वल करिअरसाठी आणि भविष्यासाठी वाटचाल करता येते अशी माहिती वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. व्ही.व्ही. कारजिन्री यांनी दिली.

ही स्पर्धा एकूण आठ विभागात  घेतली जाणार आहे. त्यामध्ये केमिकल, मेकॅनिकल, सिविल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कंप्यूटर सायन्स अँड इंजीनियरिंग,प्रथम वर्ष, एमबीए व एमसीए असे विभाग आहेत. प्रथम वर्ष विभागासाठी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. कमी वयातच विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्ती आणि संवादक्षमता वाढीस वाव देणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.

  "अपर्णा पुरस्कार" हा प्रत्येक वर्षी जिज्ञासा स्पर्धेच्या सर्व विभागातून असणाऱ्या बेस्ट प्रोजेक्ट साठी ५००० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येतो. प्रत्येक विभागाकडून या स्पर्धेला प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास रोख पारितोषकासह सन्मानचिन्ह व ०२ लाखांची इतर बक्षिसे आहेत.तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला राष्ट्रीय पातळीचे प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह  देण्यात येणार आहे.

प्राचार्य, डॉ. बी. टी. साळोखे, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, विद्यार्थी विकास,डॉ. एन. एस. धाराशिवकर, संयोजक समन्वयक डॉ. एस. टी. जाधव  व सह- संयोजक, डॉ. पी. बी. डेहनकर, प्रा. शिवानंद यांनी संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना युरेका -जिज्ञासा या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी म्हणजे एक पर्वणीच असल्याचे नमूद केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विदयार्थी समन्वयक रितेश देशपांडे, तेजस माने, विनीत पाटील व विदयार्थी प्रतिनिधी अथक परिश्रम घेत आहेत.

 कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व प्रशासकीय अधिकारी  डॉ. व्ही.व्ही. कारजिन्री यांचे मार्गदर्शन लाभत आहे .माहितीसाठी व स्पर्धेमध्ये प्रवेशासाठी संपर्क: संयोजक डॉ. एस. टी. जाधव, मो. ९७६७१००८७६ वेबसाईट : www.tkietwarana.ac.in

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes