कोल्हापूर : गुजरी येथील सोने व्यापाऱ्यांच्या दुकानातून दागीने चोरणाऱ्या परप्रांतीय कारगिरास २४ तासांचे आत अटक, २० तोळे सोन्याचे दागीने हस्तगत
schedule16 Apr 25 person by visibility 305 categoryगुन्हे

कोल्हापूर : गुजरी येथील सोने व्यापाऱ्यांच्या दुकानातून दागीने चोरणाऱ्या परप्रांतीय कारगिरास २४ तासांचे आत अटक करण्यात आले. त्याच्याकडून १८,००,०००/- रूपये किंमतीचे २० तोळे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतील गुजरी येथील सोने व्यापारदार शैदुल शेख याचे एस. आर. एस. बँगल नावाचे सोन्याचे दागीने बनविन्याचे दुकान असून त्यामध्ये बंगाली कारागिर कामास आहेत. त्यापैकी नाजीबुल औलादअली शेख या कारागिराने दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी २० तोळे सोन्याचे दागीने चोरून नेलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
तपास पथकातील पोलीस अंमलदार परशुराम गुजरे व योगेश गोसावी यांना गोपनीय बातमीदार व तांत्रीक माहिती वरून सदरचा आरोपी रविवार पेठ, पुणे येथे त्याचे मित्राकडे गेला असल्याची माहिती मिळाली असता सदरचे पथक तात्काळ पुणे येथे जाऊन आरोपी नाजीबुल औलदअली शेख, मुळ रा. सितापूर, ठाणा जांगीपाडा, जिल हुगली, राज्य पश्चिम बंगाल सध्या रा. राम गल्ली, शिवाजी मार्केट, कोल्हापूर यास ताब्यात घेवून त्याचे कब्जातून एकूण १८,००,०००/- रूपये किंमतीचे २० तोळे सोन्याचे दागीने कायदेशिर प्रक्रीया करून हस्तगत करून जुनाराजवाडा पोलीस ठाणेकडील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. नमुद आरोपीस जप्त केले मुद्देमालासह पुढील कारवाई करीता जुनाराजवाडा पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास जुनाराजवाडा पोलीस ठाणेकरवी सुरु आहे.
ही कामगीरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग अजित टिके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पो.स.ई. शेष मोरे, पोलीस अमंलदार परशुराम गुजरे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, रोहीत मर्दाने, अमित सर्जे, वैभव पाटील, संतोष बरगे, गजानन गुरव, राजेश राठोड, अनिकेत मोरे, सचिन जाधव, विलास किरोळकर यांनी केली आहे.